Harbhajan Singh, IPL 2025 Auction: भारतीय संघाने नुकतीच बांगलादेश विरूद्धची कसोटी मालिका जिंकली. आता टी२० मालिकेचा थरार रंगणार आहे आणि त्यानंतर IPL 2025 साठी लिलाव प्रक्रिया पार पडेल.
IPLच्या गेल्या हंगामात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याच्यावर इतिहासातील सर्वात महागडी बोली लावण्यात आली. कोलकाता नाइट रायडर्स संघाने त्याला २४.७५ कोटींना संघात घेतले.
IPL 2024 मध्येच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याच्यावरही मोठी बोली लागली. सनरायजर्स हैदराबादच्या संघाने त्याला २०.५० कोटींच्या बोलीसह विकत घेतले.
आतापर्यंतच्या IPL इतिहासात युवराज सिंग हा सर्वाधिक बोली लागलेला भारतीय खेळाडू आहे. २०१५ मध्ये युवराजला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने १६ कोटींना विकत घेतले होते.
IPL इतिहासात भारतीय खेळाडूंपेक्षा विदेशी खेळाडूंना जरी मोठ्या बोली लागत असतील, तरीही एका भारतीय खेळाडूसाठी तब्बल ३०-३५ कोटींची बोली लागू शकते, असा दावा हरभजन सिंगने केला आहे.
हरभजन सिंग आपल्या ट्विटमध्ये म्हणाला- 'जर जसप्रीत बुमराह स्वत: लिलावात उतरला तर तो IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. फॅन्स, तुम्ही सहमत आहात का?'
भज्जी आणखी एक ट्विट करत म्हणाला- 'माझ्या मते जसप्रीत बुमराहला संघात घेण्यासाठी सर्व १० संघ बोली लावतील आणि त्यात बुमराहला ३०-३५ कोटींपेक्षाही जास्तीची रक्कम मिळेल.'