Hardik Pandya: आता हार्दिक पांड्याचा तसा फोटो झाला व्हायरल, पत्नी नताशा म्हणाली...

Hardik Pandya Photos: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या सुट्टीवर आहे. तो ग्रीसमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याने एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच त्या फोटोवर हार्दिकची पत्नी नताशा हिने त्यावर भन्नाट कमेंट्स केली आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या सुट्टीवर आहे. तो ग्रीसमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याने एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच त्या फोटोवर हार्दिकची पत्नी नताशा हिने त्यावर भन्नाट कमेंट्स केली आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

इंग्लंडच्या दौऱ्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या सध्या कुटुंबासह ग्रीसमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. यादरम्यान हार्दिकने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हार्दिक पांड्या शर्टलेस दिसत आहे. तसेच त्याचा पोझ देण्याचा अंदाज सर्वांनाच भावला आहे.

हार्दिक पांड्याने स्वत: हा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तो समुद्र किनारी शॉर्ट्स घालून शर्टलेस होऊन डोक्यावर हॅट घालून पोझ देताना दिसत आहे. या फोटोवर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेनकोविक हिने फायरवाली इमोजी शेअर करत Hello Hotte अशी कमेंट्स लिहिली आहे. त्यावर अनेक लोकांनी रिअॅक्ट केलं आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांची जोडी भारतीय क्रिकेटमध्ये हॉट कपल म्हणून ओळखले जाते. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच दोघेही वेळोवेळी आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात, हे व्हिडीओ फॅन्स खूप पसंद करतात.

हार्दिक पांड्या याच्या या फोटोवर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस यालाही कमेंट करणे रोखता आलं नाही. डू प्लेसीसने त्याच्या पोस्टवर फायरवाली इमोजी पोस्ट करत कमेंट्स केली आहे.

नताशा हार्दिक पांड्याला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच स्टेडियममध्ये जात असते. या दाम्पत्याला एक मुलगा आहे. त्याचं नाव अगस्त्य आहे.

नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात हार्दिक पांड्याने तुफानी फलंदाजीचं प्रदर्शन केलं होत. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत तो मालिकावीर ठरला होता.

सध्या सुट्टी एन्जॉय करत असलेला हार्दिक पांड्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतून पुनरागमन करणार आहे.