Join us

IPL New Rules : आयपीएलमध्ये ‘नो बॉल, वाइड बॉल’वर आता कर्णधाराला डीआरएस घेता येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 09:01 IST

Open in App
1 / 6

क्रिकेटमध्ये एकेक धावा महत्त्वाची मानली जाते. एखादा झेल किंवा अगदी एखादी अतिरिक्त धाव यावर सामन्याचा निकाल फिरतो. एखादा खेळाडू बाद आहे की नाही याबद्दल शंका असेल तर डीआरएसच्या मदतीने शहानिशा करता येते.

2 / 6

काहीवेळा एखाद्या नो बॉल किंवा वाइड बॉलमुळेही सामना फिरतो. त्यामुळे आता क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एक आगळावेगळा निर्णय घेतला आहे.

3 / 6

आता ‘नो बॉल, वाइड बॉल’वर डीआरएस घेता येणार आहे. आगामी आयपीएलमध्येही हा नवा नियम लागू होणार आहे.

4 / 6

यंदा आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध गुजरात टायटन्स यांच्याच होणार आहे. आयपीएल आणि क्रिकेटमध्ये डीआरएसचा नियम खूप महत्त्वाचा झाला आहे, पंचांच्या चुकीच्या निर्णयाला बळी पडणाऱ्या खेळाडूंसाठी हे वरदान आहे. या वरदानात आणखी एका नियमाचा समावेश करण्यात आला आहे.

5 / 6

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, आयपीएल २०२३ पासून आणखी एका नियमाची भर पडली. नो बॉल किंवा वाइड बॉलवरही खेळाडूंना आता डीआरएस घेता येणार आहे आहे.

6 / 6

फलंदाजामागून चेंडू बाहेर आल्यानंतर पंचांना वाटले की चेंडू बॅटच्या काही भागाला स्पर्श करून मागे गेला आणि जर त्याने वाइड दिला नाही तर फलंदाज त्यावर रिव्ह्यू घेऊ शकेल. गोलंदाजी करणाऱ्या संघालाही त्याचा लाभ होईल.

टॅग्स :आयपीएल २०२२
Open in App