कोण आहे ही सुंदरी? कोहलीसोबत फोटो काढून तिला इन्स्टावर करायचीये हवा!

महिला क्रिकेटमधील नॅशनल क्रशच्या रुपात चर्चेत असणारी छोरी विराट कोहलीची मोठी चाहती निघाली आहे.

विराट कोहलीचा मोठा चाहतावर्ग आहे. कोहली लग्नबंधनात अडकला असला तरी आजही अनेक तरुणींसाठी तो क्रश ठरतो.

न्यूझीलंडची सुंदर महिला क्रिकेटरही त्याला अपवाद नाही. महिला क्रिकेटमधील नॅशनल क्रशच्या रुपात चर्चेत असणारी छोरी विराट कोहलीची मोठी चाहती निघाली आहे.

या महिला क्रिकेटरनं किंग कोहलीसंदर्भातील मनातील खास गोष्ट शेअर केलीये. ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसते.

न्यूझीलंडच्या या महिला फिरकीपूटचं नाव झारा जेटली (Xara Jetly) असं आहे. तिला विराट कोहलीसोबत फोटो काढून तो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करायचा आहे.

२२ वर्षीय किवी क्रिकेटरनं 'फाइन लेग्स- द क्रिकेट पॉडकास्ट'मध्ये कोहलीसंदर्भात मनात असणारी गोष्ट बोलून दाखवली.

न्यूझीलंड देशांतर्गत क्रिकेटमध्ये वेलिंगटन ब्लेजकडून खेळणारी क्रिकेटरनं विराट कोहलीला गोलंदाजी करण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे.

नॅशनल टीममध्ये एन्ट्री मारण्याआधीच ती लोकप्रिय ठरताना दिसत आहे.

नॅशनल टीममध्ये एन्ट्री मारण्याआधीच ती लोकप्रिय ठरताना दिसत आहे.

सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असून तिच्या फॉलोअर्सचा आकडा एक लाखाहून अधिक आहे.