१००२ विकेट्स! क्रिकेटच्या इतिहासात मोठा पराक्रम; जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड जोडीचा विक्रम

New Zealand vs England Test : जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या इंग्लंडच्या दिग्गज जलदगती गोलंदाजांनी शनिवारी कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.

जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या इंग्लंडच्या दिग्गज जलदगती गोलंदाजांनी शनिवारी कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. कसोटी क्रिकेटमध्ये मिळून सर्वाधिक १००२* विकेट्स घेण्याचा पराक्रम या दोघांनी केला.

इंग्लंडने पहिला डाव ९ बाद ३२५ धावांवर घोषित केल्यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव ३०६ धावांत गडगडला. इंग्लंडने दुसऱ्या डावात ३७४ धावा करून किवींसमोर विजयासाठी ३९४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे आणि दुसऱ्या डावात त्यांची अवस्था ३ बाद २७ अशी झाली आहे.

दरम्यान, १५ वर्ष सोबत खेळणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अँडरसन या जोडीने ९३०८.१ षटकं टाकताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. १३३ कसोटींत या जोडीने सर्वाधिक १००२* विकेट्स घेण्याचा मोठा पराक्रम केला.

जेम्स अँडरसन व स्टुअर्स ब्रॉड यांनी १३३ कसोटींत हा पराक्रम करताना ऑस्ट्रेलियन दिग्गज ग्लेन मॅक्ग्राथ व शेन वॉर्न यांचा १००१ विकेट्सचा ( १०४ कसोटी) विक्रम मोडला.

या विक्रमात श्रीलंकन जोडी चामिंडा वास व मुथय्या मुरलीधरन ८९५ विकेट्ससह ( ९५ कसोटी) तिसऱ्या, तर वेस्ट इंडिजचे दिग्गज कर्टनी वॉल्श व कर्ट्ली एम्ब्रोज ७६२ विकेट्ससह ( ९५ कसोटी) चौथ्या क्रमांकावर आहे.