NZvIND : एकाच सामन्यात Rohit Sharmaने किती रचले विक्रम, जाणून घ्या...

विश्वविक्रम रचताना रोहितने भारताच्या विराट कोहलीलाही पिछाडीवर सोडले आहे.

या सामन्यात कोहलीने विश्रांती घेतली होती. त्यामुळे या सामन्यात भारताचे नेतृत्व करण्याची जबाबदारी रोहितवर आली होती.

मुख्य म्हणजे हंगामी कर्णधार असलेल्या रोहितने नाणेफेक जिंकली, त्याचबरोबर अर्धशतक झळकावत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

या सामन्यात रोहित दुखापतग्रस्त झाला. पण दुखापतग्रस्त होण्यापूर्वी रोहिने ६० धावांची खेळी साकारली होती. या अर्धशतकासह रोहितने विश्वविक्रम रचल्याचे पाहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विश्वविक्रम आता रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितच्या खात्यामध्ये आता २५ अर्धशतके जमा झाली आहेत.

यापूर्वी या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली हा २४ अर्धशतकांसह अव्वल स्थानावर होता. पण रोहितने मात्र आता कोहलीला पिछाडीवर सोडले आहे.

या सामन्यात रोहितने या विश्वविक्रमाबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौदा हजार धावांचा पल्ला गाठला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौदा हजार धावांचा पल्ला पूर्ण करणारा तो आठवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.