आयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...

भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा कारकिर्दीच्या सुरुवातीला सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. पण जेव्हा पासून सचिनने सलामीला यायला सुरुवात केली, तेव्हापासून त्याचे नशिब फिरले आणि तो एक महान खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसला.

भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग कारकिर्दीच्या सुरुवातीला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. पण त्यानंतर तो सलामीला यायला लागला आणि त्याच्याकडून दणदणीत फटकेबाजी पाहायला मिळाली.

सध्या घडीला क्रिकेट विश्वात सर्वात जास्त चर्चा आहे ती भारताच्या रोहित शर्माची. एक सलामीवीर म्हणून रोहितने चांगलेच नाव कमावले आहे. पण कारकिर्दीच्या सुरुवातीला तो मधल्या फळीत फलंदाजीला यायचा.

आपल्या तुफानी फटकेबाजीने क्रिकेट चाहत्यांना अवीट आनंद देतो तो वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेल. सुरुवातीला गेल हा मधल्याफळीत फलंदाजी करायचा. पण त्यानंतर तो सलामीला येऊ लागला आणि त्यानंतर त्याचे आयुष्यचं पालटल्याचे पाहायला मिळाले.

एक दमदार सलामीवीर म्हणून सनथ जयसूर्याचे नाव घेतले जाते. पण कारकिर्दीच्या सुरुवातीला जयसूर्याला गोलंदाज म्हणून खेळवले जायचे आणि तो तळाच्या फळीला फलंदाजी करायला यायचा. कर्णधार अर्जुना रणतुंगाने जयसूर्याला त्याने सलामीला पाठवले आणि १९९६च्या विश्वचषकाचे जेतेपद श्रीलंकेने पटकावले.

ऑस्ट्रेलियाचा माजी महान यष्टीरक्षक अॅडम ग्रिलख्रिस्टने धडाकेबाज सलामी दिली होती. ग्रिलख्रिस्टने यष्टीरक्षकाचा आयाम पूर्ण बदलला. सुरुवातीला ग्रिलख्रिस्ट मधल्या फळीत फलंदाजीला यायचा. पण त्यानंतर त्याने सलामीला खेळायचे ठरवले आणि त्यानंतर ग्रिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन ही सलामीवीरांची जोडी चांगलीच गाजली.

श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्ने दिलशानने भल्या भल्या गोलंदाजांना धडकी भरवली होती. पण दिलशान सुरुवातीला मधल्या फळीत फलंदाजी करायचा.

एक शैलीदार फलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्क वॉ याचे नाव घेतले जाते. पण मार्कदेखील सुरुवातीला मधल्या फळीतच फलंदाजीला यायचा. कालांतराने तो सलामीला यायला लागला आणि त्याची एक दमदार सलामीवीर म्हणून ओळक निर्माण झाली.