Cricket Buzz»फोटो गॅलरी »आयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य...आयुष्यातल्या फक्त एका निर्णयाने बदलले 'या' क्रिकेटपटूंचे आयुष्य; जाणून घ्या मोठी रहस्य... By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 6:40 PMOpen in App1 / 8भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा कारकिर्दीच्या सुरुवातीला सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. पण जेव्हा पासून सचिनने सलामीला यायला सुरुवात केली, तेव्हापासून त्याचे नशिब फिरले आणि तो एक महान खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसला.2 / 8भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग कारकिर्दीच्या सुरुवातीला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. पण त्यानंतर तो सलामीला यायला लागला आणि त्याच्याकडून दणदणीत फटकेबाजी पाहायला मिळाली.3 / 8सध्या घडीला क्रिकेट विश्वात सर्वात जास्त चर्चा आहे ती भारताच्या रोहित शर्माची. एक सलामीवीर म्हणून रोहितने चांगलेच नाव कमावले आहे. पण कारकिर्दीच्या सुरुवातीला तो मधल्या फळीत फलंदाजीला यायचा.4 / 8आपल्या तुफानी फटकेबाजीने क्रिकेट चाहत्यांना अवीट आनंद देतो तो वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेल. सुरुवातीला गेल हा मधल्याफळीत फलंदाजी करायचा. पण त्यानंतर तो सलामीला येऊ लागला आणि त्यानंतर त्याचे आयुष्यचं पालटल्याचे पाहायला मिळाले.5 / 8एक दमदार सलामीवीर म्हणून सनथ जयसूर्याचे नाव घेतले जाते. पण कारकिर्दीच्या सुरुवातीला जयसूर्याला गोलंदाज म्हणून खेळवले जायचे आणि तो तळाच्या फळीला फलंदाजी करायला यायचा. कर्णधार अर्जुना रणतुंगाने जयसूर्याला त्याने सलामीला पाठवले आणि १९९६च्या विश्वचषकाचे जेतेपद श्रीलंकेने पटकावले.6 / 8ऑस्ट्रेलियाचा माजी महान यष्टीरक्षक अॅडम ग्रिलख्रिस्टने धडाकेबाज सलामी दिली होती. ग्रिलख्रिस्टने यष्टीरक्षकाचा आयाम पूर्ण बदलला. सुरुवातीला ग्रिलख्रिस्ट मधल्या फळीत फलंदाजीला यायचा. पण त्यानंतर त्याने सलामीला खेळायचे ठरवले आणि त्यानंतर ग्रिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन ही सलामीवीरांची जोडी चांगलीच गाजली.7 / 8श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्ने दिलशानने भल्या भल्या गोलंदाजांना धडकी भरवली होती. पण दिलशान सुरुवातीला मधल्या फळीत फलंदाजी करायचा. 8 / 8एक शैलीदार फलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्क वॉ याचे नाव घेतले जाते. पण मार्कदेखील सुरुवातीला मधल्या फळीतच फलंदाजीला यायचा. कालांतराने तो सलामीला यायला लागला आणि त्याची एक दमदार सलामीवीर म्हणून ओळक निर्माण झाली. आणखी वाचा Subscribe to Notifications