Join us  

"गांगुली यांनीच संभ्रम दूर करावेत; विराट- सौरव यांच्या वक्तव्यामध्ये प्रचंड विरोधाभास"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 9:42 AM

Open in App
1 / 13

कसोटी कर्णधार विराट कोहलीने सार्वजनिक वक्तव्य करताच बीसीसीआय आणि खेळाडूंमध्ये मतभेद असल्याचा खुलासा झाला आहे. कर्णधारपद सोडण्यावरुन बोर्डाने आपल्याला काहीही सल्ला दिला नव्हता, असे सांगून विराटने बोर्ड अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या आधीच्या विधानात एकमत नसल्याचे संकेत दिले.

2 / 13

मला वाटते की, गांगुलीला विचारले पाहिजे की, तो काय म्हणाला आणि कोहलीने काय म्हटले,’ असे गावसकर यांनी इंडिया टुडेला सांगितले.

3 / 13

‘कोहलीच्या या वक्तव्यामुळे बीसीसीआयसंदर्भात काही वाद असल्याचे समोर येत नाही. मला असे वाटते की, त्याने कोहलीला असा संदेश दिला होता, असा समज कुठून झाला, हे विचारावे लागेल. ते बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वक्तव्यामध्ये अशी विसंगती का आहे, हे नक्कीच विचारले पाहिजे,’ असे गावसकर म्हणाले.

4 / 13

८ डिसेंबर रोजी बोर्डाने रोहित शर्माला टीम इंडियाचा वनडे कर्णधार म्हणून घोषित केले. यावर विराट म्हणाला, ‘निवड समितीच्या बैठकीच्या दीड तास आधी अध्यक्ष चेतन शर्मा यांनी माझ्याशी संपर्क साधला.

5 / 13

मुख्य निवडकर्त्यांनी कसोटी संघावर चर्चा केली आणि नंतर मीटिंग संपण्यापूर्वी मला सांगण्यात आले की, मी एकदिवसीय संघाचा कर्णधार राहणार नाही. मला यात काही अडचण नव्हती. मात्र, यापूर्वी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.’ विराटच्या या दाव्याने संभ्रम निर्माण झाला.

6 / 13

गावसकर यांच्या मते निवड समिती प्रमुखांनी कुठलीही चूक केलेली नाही. निवड समितीने आपले काम केले. हा समितीचा अधिकारदेखील आहे. कर्णधाराकडे मतदानाचा अधिकार नसतो.

7 / 13

बीसीसीआयने भविष्यात असा वाद टाळण्यासाठी कामात स्पष्टता आणायला हवी. कुठल्याही अफवांना थारा असू नये, यासाठी कामात स्पष्टपणा असणे गरजेचे आहे. कुणाची निवड झाली आणि कुणाची निवड का नाही होऊ शकली, हे सांगण्याचा अधिकार निवड समिती प्रमुखाचा असतो.’

8 / 13

कोहलीच्या स्फोटक वक्तव्यावर निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे बोर्डाने आधी ठरविले होते. मात्र, अखेर बोर्डाने मौन पाळण्याचा निर्णय घेतला.

9 / 13

गांगुली यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, कोहलीने टी-२० कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचा फेरविचार न केल्यामुळे निवडकर्त्यांनी वनडेत विराटला कर्णधार बनविण्याचा निर्णय घेतला. दोन प्रकारांत दोन वेगळे कर्णधार बनले असते तर नेतृत्व क्षमतेत नेहमी खटके उडण्याची शक्यता निर्माण होऊ शकली असती.

10 / 13

कसोटी कर्णधार विराट कोहलीने सार्वजनिक वक्तव्य करताच बीसीसीआय आणि खेळाडूंमध्ये मतभेद असल्याचा खुलासा झाला आहे. कर्णधारपद सोडण्यावरुन बोर्डाने आपल्याला काहीही सल्ला दिला नव्हता, असे सांगून विराटने बोर्ड अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या आधीच्या विधानात एकमत नसल्याचे संकेत दिले.

11 / 13

यावर दिग्गज खेळाडूंनी आता गांगुली यांनीच संभ्रम दूर करावा, असे आवाहन केले होते, तथापि गांगुली यांनी गुरुवारी भाष्य करण्यास नकार दिला. ‘आम्ही आमचे पाहून घेऊ. कुठलेही स्पष्टीकरण नाही, पत्रकार परिषद नाही. सर्व बीसीसीआयवर सोडून द्या’, असे सांगून कोहलीच्या वक्तव्याला महत्त्व देण्याचे टाळले.

12 / 13

द. आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधी कोहलीने बुधवारी पत्रकारांशी बोलताना टी-२०चे कर्णधारपद सोडण्याचा विचार बोलून दाखवला. त्यावेळी बोर्डाकडून पदावर कायम राहा, असे कुणीही बोलले नव्हते’, असा गौप्यस्फोट केला.

13 / 13

विराटचे हे वक्तव्य गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याच्या विरोधाभासी होते. कर्णधारपद सोडू नकोस, असे विराटला बजावल्याचे गांगुली यांनी सांगितले होते. गुरुवारी स्थानिक माध्यम प्रतिनिधींशी बोलताना गांगुली म्हणाले, ‘कुठलेही भाष्य नाही, पत्रकार परिषदही नाही. बोर्डावर सोडून द्या, आम्ही आमचे पाहून घेऊ’!

टॅग्स :सौरभ गांगुलीविराट कोहलीबीसीसीआयरोहित शर्मा
Open in App