Join us

Love Story; हिंदू मुलीसोबत लग्न करण्यासाठी सोडलं पाकिस्तान अन् बनला यशस्वी क्रिकेटपटू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 13:25 IST

Open in App
1 / 10

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो... हे नेहमची ऐकत आलो आहोत. त्याची प्रचितीही अनेकदा आली आहे. क्रिकेट विश्वातही अशी अनेक उदाहरणं दिली जाऊ शकतात. पण, हिंदू मुलीसाठी देश सोडणं आणि त्यानंतर वेगळ्याच देशात जाऊन यशोशिखर पादाक्रांत करणारे फार कमीच आहेत.

2 / 10

दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीर हा त्यापैकी एक आहे. लाहोरमध्ये जन्मलेला हा फिरकीपटू दक्षिण आफ्रिका संघाचा एक महत्त्वाचा सदस्य आहे.

3 / 10

त्याला पाकिस्तान संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. आफ्रिकेच्या संघातील प्रमुख गोलंदाज म्हणून ताहीरची ओळख आहे आणि तो जगभरातील विविध लीगमध्येही प्रतिनिधित्व करतो.

4 / 10

पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करताना इम्रान ताहीर दक्षिण आफ्रिकेच्या सुम्मया दिलदार हिच्या प्रेमात पडला.

5 / 10

त्यानं तिच्यासाठी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाला. त्यानं तिच्यासोबत लग्न केलं आणि दोघांना एक मुलगा आहे.

6 / 10

1998मध्ये पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील संघाचा सदस्य असलेला इम्रान दक्षिण आफ्रिकेत गेला होता आणि तेथेच त्याची अन् सुम्मयाची भेट झाली.

7 / 10

पाकिस्तानात परतल्यानंतरही तो तिच्या संपर्कात होता आणि अखेर त्यानं सुम्मयाला लग्नासाठी राजी केलं. पण, तिनं दक्षिण आफ्रिका न सोडण्याची अट त्याच्यासमोर ठेवली.

8 / 10

तिची अट मान्य करणं इम्रान ताहीरसाठी अवघड होतं, परंतु त्यानं प्रेमाची निवड केली आणि 2006मध्ये पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला.

9 / 10

आफ्रिकेत तो स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत राहिला आणि 2011मध्ये त्याला राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यानं त्याच्या यशाचं सर्व श्रेय पत्नीला दिले आहे.

10 / 10

ताहीरनं आतापर्यंत आफ्रिकेकडून 20 कसोटी, 107 वन डे आणि 38 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. त्यानं गतवर्षी वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

टॅग्स :द. आफ्रिकापाकिस्तान