बांगलादेश संघानं पाक आधी या संघाची केलीये घरच्या मैदानावर शिकार

पाक आधी बांगलादेशनं या संघांना घरच्या मैदानात दिलाय दणका

बांगलादेशचा संघाने भारत दौऱ्याआधी पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे.

रावळपिंडी येथील कसोटी मालिकेआधी बांगलादेशनं पाकिस्तान विरुद्ध १३ कसोटी सामन्यात एकही विजय नोंदवला नव्हता.

रावळपिंडीतील पहिल्या कसोटीतील विजयानंतर याच मैदानातील दुसरा सामना जिंकून थेट कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम बांगलादेशनं करून दाखवला.

पाकिस्तानच्या संघाला त्यांनी घरच्या मैदानात पराभूत करून दाखवत नवा इतिहास रचला आहे.

बांगलादेशच्या संघाने आपल्या आतापर्यंतच्या कसोटी इतिहासात दुसऱ्याच्या घरात जाऊन जिंकलेली ही तिसरी कसोटी मालिका आहे.

याआधी बांगलादेशच्या संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला त्यांच्या घरात शह दिला होता. २००९ मध्ये बांगालादेशनं वेस्ट इंडिज विरुद्ध २-० अशी कसोटी खिशात घातली होती.

२०२१ मध्ये बांगलादेशच्या संघाने झिम्बाब्वेला त्यांच्या घरात १-० असे पराभूत करत मालिका जिंकली होती.

पाकिस्तान विरुद्धच्या मालिका विजयाने बांगलादेश संघाचा आत्मविश्वास उंचावला असला तरी टीम इंडियाविरुद्धची त्यांची लढाई सोपी नसेल. कारण टीम इंडियाविरुद्ध १३ सामन्यात त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही. यातील दोन सामने अनिर्णित राखण्यात त्यांना यश मिळाले आहे.