रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम

PAK vs ENG 1 st Test : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात हॅरी ब्रूक आणि जो रुट यांनी ऐतिहासिक कामगिरी केली.

पाकिस्तानच्या धरतीवर त्रिशतक झळकावणारा हॅरी ब्रूक हा पाचवा खेळाडू ठरला.

सलामीच्या सामन्यात जो रुट आणि हॅरी ब्रूक यांनी ऐतिहासिक अशी ४५४ धावांची भागीदारी नोंदवली. ही इंग्लंडच्या इतिहासातील सर्वाधिक भागीदारी ठरली.

हॅरी ब्रूक कसोटी क्रिकेटच्या इतिहासात त्रिशतक झळकावणारा सहावा इंग्लिश खेळाडू ठरला.

हॅरी ब्रूकने ३१७ धावा करुन कसोटी क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी केली.

इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ७ बाद ८२३ धावा केल्या. यासह त्यांनी कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये चौथे स्थान गाठले.

या सामन्यातून जो रुटने इंग्लंडसाठी कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावला. त्याने ॲलिस्टर कुकला मागे टाकत १२,६६४ धावांपर्यंत मजल मारली.

जो रुटने २६२ धावांची द्विशतकी खेळी करुन कसोटीमधील त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली.