इमाम आणि अनमोल शनिवारी विवाहबंधनात अडकले. पाकिस्तानी खेळाडूने सोशल मीडियावर याचे फोटो शेअर केले आहेत.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू इमाम-उल-हक विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याची प्रेयसी अनमोल महमूदसोबत विवाहगाठ बांधली.
इमाम-उल-हकने एक कॅप्शन लिहले असून अनमोलप्रती आपले प्रेम व्यक्त केले.
इमामच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने आतापर्यंत एकूण २२ कसोटी सामने, ७२ वन डे आणि २ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
'आज आम्ही केवळ आयुष्यभराचे साथीदार बनलो नाही तर मैत्रीचे बंध देखील घट्ट झाले आहेत. आज मी फक्त माझ्या जिवलग मैत्रिणीसोबत लग्न केले नाही तर तिच्या हृदयात माझे कायमचे घर देखील शोधले आहे', असे इमामने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले.
२७ वर्षीय इमामने कसोटी क्रिकेटमध्ये ३८.७९च्या सरासरीनुसार १४७४ धावा केल्या आहेत.
तर, वन डेमध्ये ४८.२८च्या सरासरीने एकूण ३१३८ धावा कुटल्या. ट्वेंटी-२० मध्ये केवळ दोन सामने खेळलेल्या इमामला २१ धावा करण्यात यश आले.