Join us  

भारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 2:11 PM

Open in App
1 / 11

शोएब मलिकनंतर आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली भारतीय मुलीशी विवाह करणार आहे. हरयाणा येथील मेवात जिल्ह्यातील शामिया आरझूशी पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीचा विवाह होणार आहे. दुबईतील अटलांटा पाल्म हॉटेलमध्ये आज शामिया आणि हसन विवाहबंधनात अडकणार आहे.

2 / 11

शामिया एअर अमीरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर आहे. तिनं हरयाणा येथील मानव रचना युनिव्हर्सिटीतून बी. टेच ( एरोनॉटीक) ची पदवी घेतली आहे.

3 / 11

मागील तीन वर्षांपासून शामिया दुबईतच स्थायिक आहे. तिचे कुटुंबीय नवी दिल्लीत राहतात.

4 / 11

पाकिस्तानी क्रिकेटपटूशी विवाहबद्ध होणारी शामिया ही चौथी भारतीय मुलगी आहे. यापूर्वी झाहीर अब्बास, मोहसीन खान, शोएब मलिक यांनी भारतीय महिलांशी विवाह केला आहे.

5 / 11

हसन अलीच्या लग्नापूर्वीच्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

6 / 11

हसननं वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानं चार सामन्यांत दोन विकेट्स घेतल्या होत्या, पण 38 षटकांत त्यानं 256 धावा दिल्या.

7 / 11

हसननं आतापर्यंत 53 वन डे आणि नऊ कसोटी सामन्यांत एकूण 88 विकेट्स घेतल्या आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 30 सामन्यांत 35 विकेट्स आहेत.

8 / 11

भारताची टेनिसपटू आणि शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झा हीनेही हसन अलीचे अभिनंदन केले आहे आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :पाकिस्तानदुबईभारतशोएब मलिकसानिया मिर्झा