पाकिस्तानचा दिग्गज शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशासोबत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी विवाहबंधनात अडकला आहे. शाहीन शाह आफ्रिदी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे.
शाहीनने शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशाशी लग्न केले आहे. माजी क्रिकेटर सईद अन्वर आणि पाकिस्तानचा विद्यमान कर्णधार बाबर आझम यांसारखे खास पाहुणे देखील या लग्नाला उपस्थित होते.
शाहीन आफ्रिदीने यावर्षी फेब्रुवारीमध्ये अंशाशी लग्न केले होते. मात्र, व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांचे अनेक नातेवाईक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते.
याच कारणामुळे शाहीनने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. म्हणून नातेवाईकांच्या उपस्थितीत शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला.
लग्नानंतर शाहीनने पत्नी अंशा आणि सासरा शाहिद आफ्रिदीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.
फोटो शेअर करत त्याने म्हटले, 'तुमच्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार. माझ्या खास व्यक्तीसोबत प्रेम आणि हास्याची सुरुवात झाली आहे.'
शाहीन आफ्रिदीच्या दुसऱ्या लग्नाला अनेक खास पाहुणे उपस्थित होते. त्यात दिग्गज क्रिकेटपटू सईद अन्वरचाही समावेश आहे. सईद अन्वरचे स्वागत खुद्द शाहिद आफ्रिदीने केले. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमही लग्नाला आला होता.
पाच ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी वन डे विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी. राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद.