"तो फलंदाज म्हणजे सुनील गावसकर. आजकालच्या फलंदाजांनी त्यांच्या फलंदाजीच्या व्हिडीओ पाहिल्या तर त्यांना खूप काही शिकता येईल. गावसकर कमी उंचीचे होते पण वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या खतरनाक वेगवान गोलंदाजांपुढे त्यांनी आपली फलंदाजी दाखवून दिली आणि यशस्वी ठरले", असे मियाँदाद म्हणाला.