पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीर आणि त्याची पत्नी नर्जीस यांच्या घरी नन्ही परी आली आहे.
28 वर्षीय आमीरनं सोशल मीडियावरून ही गोड बातमी दिली. त्यानं तिच्या मुलीचा फोटोही शेअर केला.
आमीर आणि नर्जीस यांनी 2016मध्ये लग्न केलं आणि त्यांना नोव्हेंबर 2017मध्ये पहिली मुलगी झाली.
पत्नी गर्भवती असल्यामुळे आमीर पाकिस्तान क्रिकेट संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर नाही गेला.
फिक्सिंगमुळे आमीरला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. पण, त्यानंतर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केलं.
शिक्षेच्या काळात त्याचं आणि नर्जीस यांचं प्रेम जमलं. 2010मध्ये दोघांची पहिली भेट झाली.
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे आमीरवर पाच वर्षांची बंदी घातली गेली आणि तेव्हाच नर्जीससोबत त्याची ब्रिटनमध्ये भेट झाली
नर्जीसचा जन्म ब्रिटनचा आहे. आमीरच्या संकटकाळात ती त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहीली.