पाकिस्तान अजूनही सेमीच्या शर्यतीत; पण ही समीकरणे जुळली तर...

साध्या साध्या संघांनी तगड्या संघांना धुळ चारल्याचे या वर्ल्डकपने पाहिले आहे. यामुळे समीकरणे पुन्हा बदलत चालली आहेत.

मॅच दक्षिण आफ्रिकेची होती, पण धाकधूक भारतीयांना होती, असे काहीसे वातावरण दोन दिवसांपूर्वी होते. परंतू, अटीतटीच्या लढतीत आफ्रिकेने पाकिस्तानवर मात केली आणि पाकिस्तान सेमी फायनलमध्ये जाण्याचे चान्स संपल्यात जमा झाल्यासारखे झाले. साध्या साध्या संघांनी तगड्या संघांना धुळ चारल्याचे या वर्ल्डकपने पाहिले आहे. यामुळे समीकरणे पुन्हा बदलत चालली आहेत.

या विजयाने आफ्रिकेने गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर भारत दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. आफ्रिकन संघाने आतापर्यंत सहापैकी पाच सामने जिंकले आहेत. फक्त नेदरलँडने आफ्रिकेला धक्का दिला होता. न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

खरी हलचल आता चौथ्या नंबरसाठी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 6 सामने खेळले असून दोन जिंकले आहेत, तर 4 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.समीकरण असे बनत चालले आहे की पाकिस्तान अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहिला आहे.

पाकिस्तान संघ सहाव्या क्रमांकावर आहे. तर त्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका आहे. पाकिस्तानला आता बांग्लादेश, न्युझीलंड आणि इंग्लंडसोबत सामने खेळायचे आहेत. हे तिन्ही सामने पाकिस्तानला जिंकावे लागणार आहेत.

चला मानून चालुया की पाकिस्तानने या तिन्ही मॅच जिंकल्या तर त्यांचे १० गुण होतील. परंतू, तेवढे गुण त्यांना पुरेसे नाहीएत. भारत आणि आफ्रिकेकडे आधीच १० गुण आहेत आणि न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडे आठ गुण आहेत.

पाकिस्तानला आता भारत, आफ्रिका आणि न्यूझीलंड या टॉप तीन मध्ये राहण्यासाठी प्रार्थना करावी लागणार आहे. जर ऑस्ट्रेलिया उरलेल्या तीनपैकी दोन मॅच हरली तर पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर जाऊ शकते. परंतू, एवढेच नाही तर श्रीलंका आणि अफगाणिस्तान तीनपेक्षा जास्त मॅच जिंकता नयेत.

ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांनी प्रत्येकी 10 गुणांसह साखळी फेरी पूर्ण केली तर सर्वोत्तम रनरेट असलेला संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. यासाठी न्यूझीलंडला तीन सामने गमवावे लागणार आहेत. हे होण्याची मुळीच शक्यता नाहीय.

विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईत होणार आहे. दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे. वर्ल्ड कपची फायनल 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.