Join us

T20 World Cup Afg Vs. Pak : पाकिस्तानच्या आसिफ अलीनं केलं 'बंदूक' सेलिब्रेशन; अफगाण राजदूतांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 15:18 IST

Open in App
1 / 7

T20 World Cup Afg Vs. Pak : टी २० विश्वचषकातील आपल्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा (Pakistan vs Afghanistan) पराभव केला होता. सलग तिसऱ्या विजयानंतर बाबर आझमच्या (Babar Azam) टीमनं सेमीफायनल्समध्ये पोहोचण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलं आहे.

2 / 7

अफगाणिस्तान विरोधातील सामन्यात पाकिस्तानच्या विजयात फलंदाज आसिफ अलीचीही महत्त्वाची भूमिका होती. चार षटकारांच्या मदतीनं त्यानं २५ धावा ठोकल्या होत्या.

3 / 7

आता आसिफ अली एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. अफगाणिस्तान विरोधातील मॅचच्या विजयी फलंदाजीनंतर आसिफ अलीनं सेलिब्रेशन केलं, याचं फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हारल होत आहेत. श्रीलंकेतील अफगाणिस्तानचे राजदूत एम.अशरफ हैदरी यांनी या फोटोवर संताप व्यक्त केला आहे.

4 / 7

'पाकिस्तानचा प्रमुख खेळाडू आसिफ अलीनं दाखवलेली आक्रमकता ही नीदनीय कृत्य आहे. त्यानं आपली बॅट बंदूकीप्रमाणे करून अफगाण खेळाडूंना दाखवली, ज्यांनी त्यांच्या टीमला जबरदस्त टक्कर दिली,' असं ते म्हणाले.

5 / 7

'या सर्वांच्या वर खेळ हा एक प्रतिस्पर्धा, मैत्री आणि शांततेशी निगडीत आहे. युद्धासाठीही एक वेळ येईल,' असंही त्यांनी ट्वीट करत नमूद केलं. त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचाही एक फोटो व्हायरल होत आहे.

6 / 7

३१ ऑक्टोबर २००५ मध्ये श्रीलंकेविरोधातील एकदिवसीय सामन्यात धोनीनं शतक ठोकलं होतं. त्यानंतर त्यानंही बॅट अशाच प्रकारे धरली असल्याचा दावा यात करण्यात येत आहे.

7 / 7

'धोनीनं श्रीलंकेविरोधातील सामन्यात असंच केलं होतं. परंतु ते समजदार आहेत आणि क्रिकेट चांगल्या भावनेने खेळतात. खेळासोबत राजकारण मिसळू नका,' अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनचे पत्रकार अब्दुल गफ्फार यांनी दिली.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१अफगाणिस्तानपाकिस्तान
Open in App