Virat Kohli: पाकिस्तानी गोलंदाजाची पत्नी किंग कोहलीची 'जबरा' फॅन; ग्लॅमरस लूकने चाहते 'घायाळ'

virat kohli fan: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे जगभरात खूप चाहते आहेत.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन हलीची पत्नी सामिया आरजू भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीची फॅन आहे. सामिया आरजूने स्वतः सोशल मीडियावर सर्वांसमोर याचा खुलासा केला होता.

सामियाने एकदा इंस्टाग्रामवर प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान सांगितले होते की, विराट कोहली तिचा आवडता क्रिकेटर आहे. खरं तर पाकिस्तानची सून सामिया आरजू ही मूळची भारतातील हरयाणा येथील आहे.

सामियाचे कुटुंब हरयाणातील नूह जिल्ह्यातील मेवात भागातील आहे. सामियाचे वडील लियाकत अली हरयाणा सरकारचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ते 15 वर्षांपासून दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमध्ये स्थायिक आहेत.

सामिया आरजू देखील फरीदाबादमध्ये वाढली. सामियाने फरिदाबादमधील एका खासगी विद्यापीठातून एरोनॉटिक इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती आणि त्यानंतर ती दुबईत काम करत होती. हसन अलीसोबत सामियाची पहिली भेट दुबईतच झाली होती.

सानिया आरजूच्या कुटुंबातील काही सदस्य पाकिस्तानमध्ये देखील आहेत. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना पाकिस्तानातील नवरदेव असण्यास काहीच हरकत नव्हती. सामिया आणि हसन अली यांचा विवाह 20 ऑगस्ट 2019 रोजी दुबईमध्ये झाला होता.

हसन अली आणि सामिया आरजू लग्नापूर्वी जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. सामिया आणि हसन यांच्या लग्नाला पाकिस्तानी संघातील खेळाडूंनी हजेरी लावली होती.

रिपोर्ट्सनुसार, हसन अलीने त्याच्या लग्नात विराट कोहली, युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांना आमंत्रित केले होते. मात्र, मालिका सुरू असल्यामुळे भारतीय खेळाडू सहभागी होऊ शकले नाहीत.

सामिया आरजू आणि हसन अली 6 एप्रिल 2021 रोजी एका मुलीचे आई बाबा झाले. सामिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.