भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत आपल्या कामगिरीनं अनेकांना त्याचा फॅन बनवलं. मैदानावरील कामगिरीप्रमाणे इरफानच्या लुक्सचीही खूप चर्चा रंगली.
त्यामुळेच त्याच्या फॅन्स फॉलोअर्समध्ये महिलांची संख्या अधिक होती.आता इरफान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी महिला फॉलोअर्सची संख्या कमी झालेली नाही.
एका पाकिस्तानी महिलेनं नुकतंच सोशल मीडियावर इरफानवरील असलेलं प्रेम कबुल केलं.
इरफानच्या प्रेमात ही पाकिस्तानी महिला एवढी आकंठ बुडाली होती की त्याच्या ऑटोग्राफसाठी ती चक्क टीम इंडियाच्या ड्रेसिंगरुमपर्यंत पोहोचली होती.
पाकिस्तानी महिलेनं ट्विटरवर लिहिलं की, 2006मध्ये इरफानच्या प्रेमात मी आकंठ बुडाली होती. तेव्हा अबुधाबी येथे भारत - पाकिस्तान सामना खेळला गेला. तेव्ही मी स्टेडिमयमध्येच उपस्थित होती.''
''सामना संपल्यानंतर आणि प्रेझेंटेशन झाल्यानंतर खेळाडू सुरक्षा रक्षकांनी गेट उघडला आणि त्यानंतर कोणीही मैदानावर जाऊ शकत होतं. तेव्हा सुरक्षेसंदर्भात एवढी बंधनं नव्हती,''असं तिनं सांगितलं.
ती पुढे म्हणाली,''मी मैदानावर गेले आणि तेथील लोकांना मला इरफानला भेटायचे असे सांगू लागले. तेव्हा माझ्या बोलण्याकडे कुणी लक्ष दिलं नाही. त्यानंतर मी भारतीय संघाच्या ड्रेसिंगच्या दिशेनं गेली आणि तिथे जाऊन पठाण-पठाण असं ओरडली.''
पाकिस्तानी महिलेच्या त्या कृतीनं ड्रेसिंग रुममधील खेळाडू मोठमोठ्यानं हसू लागलं. 2-3 वेळा असं ओरडल्यानंतर इरफान बाहेर आला आणि भेटला, असं तिने सांगितले.
इरफानला पाहून मी स्तब्ध झाले. त्यानं मला ऑटोग्राफ दिला आणि माझ्यासोबत फोटोही घेतला, असंही ती म्हणाली.
इरफाननं 29 कसोटी सामन्यांत 100 विकेट्स घेतल्या आहेत. 120 वन डे क्रिकेटमध्ये 173,तर 24 ट्वेंटी-20 सामन्यांत 28 विकेट्स घेतल्या आहेत.