इम्रान हे जसे क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध होते, तसे आपल्या लूकमुळे त्यांनी अनेक तरुणींना भुरळ पाडली होती.
अनेक तरुणींच्या गळ्यातील ते ताइत होते.
कोणत्याही पार्टीमध्ये इम्रान यांच्या भोवती तरुणींचा वेढा पाहायला मिळायचा.
इम्रान यांच्याशी बोलण्यासाठी तरुण आतूर असायच्या.
बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीबरोबर इम्रान यांचे अफेअर सुरु असल्याची जोरदार चर्चा होती.
ही तरुणी आपल्या हॉट अदांसाठी बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध होती.
ही बॉलीवूडची अभिनेत्री होती झीनत अमान.
एका पार्टीमध्ये इम्रान आणि झीनतची भेट झाली होती.
या दोघांमध्ये काही काळानंतर सतत भांडणे होत होती.
त्यामुळे या दोघांचे अफेअर जास्त काळ टिकले नाही.
इम्रानने जेमिमा गोल्डस्मिथबरोबर लग्न केले.
दुसरीकडे झीनतने मझहर खान यांच्याशी लग्न केले.