"IPL मेगा लिलावात रिषभ पंतला ५० कोटी मिळायला हवेत"

आयपीएलच्या मेगा लिलावात पंतवर मोठी बोली लागेल, अशी चर्चा

आयपीएलच्या मेगा लिलावाआधी १० फ्रँचायझी संघांनी एकूण ४७ खेळाडूंना आपल्यासोबत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पंतला रिलीज केल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

त्यामुळे भारतीय संघाचा स्टार विकेट किपर आता आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे.

मेगा लिलावात भारताच्या या स्टार खेळाडूवर मोठी बोली लागेल, अशी चर्चा रंगत आहे. त्यात आता पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरनं यासंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या मुंबई कसोटी सामन्यातील पंतच्या खेळीनं पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीला चांगलाच प्रभावित झाला आहे.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर त्याची खेळी पाहताना तो अगदी पाटा खेळपट्टीवर खेळतोय असे वाटत होते. परफेक्ट शॉट सिलेक्शनसह त्याने आपल्यातील धमक दाखवून दिली, असा उल्लेख करत पाक क्रिकेटरनं पंतच कौतुक केले आहे.

पाकचा माजी दिग्गज बासित अली भारतीय विकेट किपर बॅटरचं कौतुक करताना म्हणाला आहे की, न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या डावात ६० धावा आणि दुसऱ्या डावात ६४ धावांची खेळी करणाऱ्या पंतला आयपीएल लिलावात २५ कोटी बोली लागेल, अशी चर्चा ऐकायला मिळते. पण तो यापेक्षा मोठ्या रक्कमेचा हक्कदार आहे. आगामी लिलावात त्याला ५० कोटी रुपये सहज मिळायला हवेत, असे पाकच्या माजी क्रिकेटरनं म्हटलं आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत रिषभ पंत हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ६ डावात ४३.५० च्या सरासरीने त्याने ३ अर्धशतकासह २६१ धावा केल्या. ही कामगिरी आगामी आयपीएल स्पर्धेत त्याचा भाव वाढवणारी ठरू शकते.

आयपीएल स्पर्धेत ९ वर्षे दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना पंतनं या संघाची कॅप्टन्सीही केली आहे. आगामी लिलावात त्याच्यावर किती बोली लागणार? कोणता संघ त्याला आपल्या ताफ्यात घेण्यात यशस्वी होणार ते पाहण्याजोगे असेल.