लग्नाआधी पहिलं अपत्य; स्टार क्रिकेटरच्या पत्नीनं आता पुन्हा दिली 'गुडन्यूज'

सोशल मीडियावरील फोटोतून बेबी बंप फ्लाँट करत तिने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कॅप्टन पॅट कमिन्स दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी बेकी बोस्टन हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गुडन्यूज शेअर केलीये.

पॅट कमिन्स आणि बेकी बोस्टन या जोडीनं २०२० मध्ये साखरपुडा उरकल्यावर ऑगस्ट २०२२ मध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती.

पॅट कमिन्सची पत्नी बेकीनं लग्नाआधी ८ ऑक्टोबर २०२१ रोही पहिल्या अपत्याला जन्म दिला होता. या मुलाचं नाव एल्बी असं आहे.

क्रिकेटर पॅट कमिन्सच्या पत्नीने आपल्या मुलासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोशल मीडियावरील फोटोतून बेबी बंप फ्लाँट करत तिने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे.

पॅटची पत्नी बेकी बोस्टन ही ३४ वर्षांची आहे. पण तिचा फिटनेस इतका कमालीचा आहे की, वय हा तिच्यासाठी फक्त आकडा आहे, असेच वाटते.

बेकी बोस्टन आयपीएलमुळे भारतीय चाहत्यांशीही चांगली कनेक्ट आहे. आयपीएल मॅचेसवेळी ती आपल्या पतीला चीअर करतानाही पाहायला मिळाले आहे.