भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे देशातील सर्वात चर्चिले जाणारे कपल.
एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर 11 डिसेंबर 2017मध्ये या दोघांनी इटलीत विवाह केला.
त्यांच्या लग्नाला कुटुंबातील मंडळी आणि मोजकाच मित्रपरिवार उपस्थित होता.
लग्नानंतर हे दोघंही मुंबईतील आलिशान अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले.
त्यांनी 2016मध्ये हा अपार्टमेंट खरेदी केला होता. मुंबईच्या वरळी येथील ओमकार 1973 येथे त्यांचा हा अपार्टमेंट आहे.
विरुष्कानं 34 कोटींमध्ये हा आलिशान आपार्टमेंट खरेदी केला. याच अपार्टमेंटच्या टॉवर C मध्ये युवराज सिंगचाह फ्लॅट आहे.
चला मग त्यांच्या आलिशान अपार्टमेंटची सफर करूया...