भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर सोमवारी विवाहबंधनात अडकला. मैदानावर दिग्गज फलंदाजांची दांडी गुल करणाऱ्या शार्दुल ठाकूरची मिताली परूळकरने विकेट घेतली.
शार्दुल-मितालीच्या लग्नसोहळ्याला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्नी रितिकासह हजेरी लावली होती.
याशिवाय श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री हे सुद्धा शार्दुलच्या लग्नसोहळ्यातले वऱ्हाडी होते.
केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यानंतर या वर्षी लग्न करणारा शार्दुल ठाकूर हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर यांच्या लग्नाचा पहिला फोटोही समोर आला आहे.
शार्दुल-मितालीचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नापूर्वी संगीत समारंभ आणि हळदी समारंभही आयोजित करण्यात आले होते. यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले आहेत.
त्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यरही सहभागी झाले होते. एवढेच नाही तर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, अभिषेक नायर आणि मुंबई संघाचा स्थानिक सिद्धेश लाड देखील स्पॉट झाले होते.
शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर यांची नोव्हेंबर २०२१ मध्ये एंगेजमेंट झाली.
बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी हे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. शार्दुल ठाकूरची पत्नी व्यवसायाने व्यावसायिक महिला असून ती एक स्टार्टअप कंपनी चालवते.