Join us  

भारताच्या 'फाईव्ह स्टार्स'सह एकाच दिवशी जन्मले ५ देशांचे ११ क्रिकेटपटू! तयार होईल तगडी Playing XI

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 12:38 PM

Open in App
1 / 12

६ डिसेंबर रोजी जन्मलेल्या खेळाडूंची यादी अशी आहे की त्यांची मिळून एक स्वतंत्र प्लेइंग इलेव्हन बनवता येईल. हे अकरा खेळाडू ५ देशांचे आहेत आणि त्यातले ६ भारतातील आहेत. पाकिस्तान, इंग्लंड, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडचे १-१ खेळाडू आहेत.

2 / 12

नासिर जमशेद (पाकिस्तान) - ६ डिसेंबर १९८९ मध्ये जन्मलेल्या नासिरने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पाकिस्तानसाठी तीनही फॉरमॅटमध्य मिळून ६८ सामने खेळून जवळपास २००० धावा केल्या. त्यात वन डेतील ३ शतकं व ८ अर्धशतकांचा समावेश आहे.

3 / 12

करुण नायर (भारत) - १९९१ मध्ये राजस्थान येथे जन्मलेल्या करूण नायरने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. भारतासाठी आतापर्यंत त्याने ६ कसोटी आणि २ वन डे सामने खेळले आहेत. ६ कसोटींतील ३७४ धावांमध्ये नायरने नाबाद ३०३ धावांची सर्वोत्तम खेळी केली होती.

4 / 12

श्रेयस अय्यर (भारत) - भारतीय संघाच्या मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस याचा जन्म १९९४ सालचा... २०१७ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तो भारतीय संघाचा सदस्य आहे. सध्या संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. त्याने ५ कसोटीत ४२२, ३७ वन डे त १४५२ आणि ४९ ट्वेंटी-२० त १०४३ धावा केल्या आहेत.

5 / 12

शॉन एर्व्हिन (झिम्बाब्वे) - झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू शॉन एर्व्हिनचा जन्म १९८२ सालचा. त्याने झिम्बाब्वेसाठी ५ कसोटीत २६१ धावा व ९ विकेट्स, ४२ वन डेत ६४८ धावा व ४१ विकेट्स घेतल्या आहेत.

6 / 12

सुयश प्रभुदेसाई (भारत) - हा आपला २५ वा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्याला अद्याप भारतीय संघात संधी मिळालेली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो गोव्याकडून खेळतो.

7 / 12

ग्लेन फिलिप्स (न्यूझीलंड) - या २६ वर्षीय खेळाडूने २०२० मध्ये न्यूझीलंडकडून पदार्पण केले. नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत फिलिप्सने खणखणीत शतक झळकावले होते. ५६ ट्वेंटी-२०त १३६१ धावा त्याच्या नावावर आहेत. १ कसोटी व ९ वन डे सामनेही तो खेळला आहे.

8 / 12

अँड्य्रू फ्लिंटॉफ ( इंग्लंड ) - इंग्लंडचा माजी कर्णधार आज ४५ वर्षांचा झाला आहे. त्याने ७९ कसोटींत ३८४५ धावा व २२६ विकेट्स घेतल्या. १४१ वन डे सामन्यात त्याच्या नावावर ३३९४ धावा व १६९ विकेट्स, ७ ट्वेंटी-२०त ७६ धावा व ५ विकेट्स आहेत.

9 / 12

हॅरी टेक्टर (आयर्लंड) - २०१९ मध्ये आयर्लंडमध्ये पदार्पण केल्यापासून हॅरी टेक्टर सतत संघासोबत आहे. २३ वर्षीय हेक्टरने वन डे व ट्वेंटी-२० सामन्यांत आपली छाप पाडली आहे. २३ वन डेत त्याने ४७.११च्या सरासरीने ८९५ धावा केल्या आहेत, तर ट्वेंटी-२०त ५१ सामन्यांत ८३६ धावा केल्या आहेत.

10 / 12

रवींद्र जडेजा ( भारत ) ३४ वर्षीय जडेजा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आहे आणि सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. त्याने ६० कसोटींत २५२३ धावा, १७१ वन डेत २४४७ धावा आणि ६४ ट्वेंटी-२०त ४५८ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ४८०+ विकेट्स आहेत.

11 / 12

जसप्रीत बुमराह (भारत) - जडेजाप्रमाणेच २९ वर्षीय जसप्रीत बुमराह देखील दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. पण तो भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. त्याने ३० कसोटीत १२८ विकेट्स, ७२ वन डेत १२१ आणि ६० ट्वेंटी-२०त ७० विकेट्स घेतल्या आहेत.

12 / 12

आरपी सिंग ( भारत ) - रुद्र प्रताप सिंगने भारताकडून १४ कसोटी , २८ वन डे व १० ट्वेंटी-२० सामने खेळताना ११४ विकेट्स घेतल्या आहेत.

टॅग्स :जसप्रित बुमराहरवींद्र जडेजाश्रेयस अय्यर
Open in App