Join us

"त्याच्यावर दिल्लीच्या संघाचा विश्वास आहे...", पृथ्वी शॉच्या 'फ्लॉप' शोवर कोचचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 16:52 IST

Open in App
1 / 10

सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम म्हणजे काही युवा भारतीय फलंदाजांसाठी अग्निपरीक्षाच आहे. कारण या मोठ्या व्यासपीठावर चमकदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

2 / 10

या युवा खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ यांसह आणखी काही शिलेदारांचा समावेश आहे.

3 / 10

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉचा फ्लॉप शो अद्याप सुरूच आहे. चालू हंगामात त्याला एकही मोठी खेळी करता आली नाही.

4 / 10

आयपीएल २०२३ मध्ये पृथ्वीने सहा सामने खेळले असून १२, ७, ०, १५, ०, १३ अशा धावा केल्या आहेत. एवढेच नाहीतर सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये देखील स्थान मिळाले नव्हते.

5 / 10

दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटिंगसह संघ व्यवस्थापनाला पृथ्वीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. अशातच पृथ्वी शॉचे बालपणीचे प्रशिक्षक प्रशांत शेट्टी यांनी त्याच्या फॉर्मवर एक मोठे विधान केले आहे.

6 / 10

पृथ्वी आणि माझ्या अपेक्षा मागील काही दिवसांपासून खऱ्या होत नाही आहेत. मात्र, आतापर्यंत त्याची खेळण्याची शैली ही अशीच राहिली असून तो नेहमी जोखीम घेतो. त्याच्यासारख्या खेळाडूसाठी पहिले दोन सामने खूप महत्त्वाचे असतात, असे प्रशांत शेट्टी यांनी म्हटले.

7 / 10

'जेव्हा तुम्ही जलदगतीने धावा करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. एखाद्या संघाला जशी गतीची गरज असते, तशीच शॉलाही येथे सुरुवातीच्या गतीची नितांत गरज आहे. काही सामन्यांमध्ये तसे झाले नाही आणि दबाव वाढतच गेला', असे शेट्टी यांनी News18शी बोलताना म्हटले.

8 / 10

पृथ्वी शॉच्या फलंदाजीबद्दल बोलताना प्रशांत शेट्टी म्हणाले की, त्याचा उत्साह अधिक आहे. तो नेटमध्येही चांगली फलंदाजी करत आहे. तो युवा असून अनुभवी देखील आहे आणि त्याला माहित आहे की जर तुम्ही नेटमध्ये चांगली फलंदाजी करत असाल तर सामन्याच्या कोणत्याही टप्प्यावर शानदार खेळी करू शकता.

9 / 10

तसेच जर कोणी नेटमध्ये चांगली फलंदाजी करत नसेल तर तो व्यवस्थापनाचा विश्वास संपादन करू शकत नाही, ही एक वेगळी गोष्ट आहे. व्यवस्थापनाने पृथ्वीला बराच वेळ दिला आहे, त्यांचाही त्याच्यावर विश्वास आहे, असे प्रशांत शेट्टी यांनी अधिक सांगितले.

10 / 10

पृथ्वी शॉ आयपीएल २०२३ मध्ये एकाही सामन्यात २० हून अधिक धावा करू शकला नाही. यंदाच्या हंगामात त्याची सर्वोत्तम धावसंख्या केवळ १५ आहे, जी त्याने मुंबई इंडियन्सविरूद्ध घरच्या मैदानावर केली होती.

टॅग्स :पृथ्वी शॉदिल्ली कॅपिटल्सभारतीय क्रिकेट संघ
Open in App