न्यू इयर पार्टीत पृथ्वी शॉसोबत दिसलेली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? ...ही तर नाशिकची! जाणून घ्या...

भारतीय संघाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पृथ्वी शॉ याला आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी संधी देण्यात आलेली नाही. त्यावर पृथ्वीनं उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. त्यानं इन्स्टाग्रामवरुन प्रोफाइल पिक देखील काढून टाकलं होतं. आता गतवर्षातील निराशाजनक गोष्टी बाजूला सारुन पृथ्वीनं नव्यानं सुरुवात केली आहे. (इन्स्टाग्राम)

रिपोर्ट्सनुसार पृथ्वी शॉ यानं न्यू इयर पार्टी मुंबईतील एका पबमध्ये केली. २३ वर्षीय पृथ्वी शॉ यानं पार्टीचे काही फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. यात पृथ्वी एका तरुणीसोबत दिसत आहे. पृथ्वीनं शेअर केलेल्या फोटोतील ती तरुणी कोण? अशी चर्चा सुरू झाली.

पृथ्वीसोबत दिसलेली त्या मिस्ट्री गर्लची माहिती आता मिळाली आहे. ती मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री निधी रवि तापडिया आहे. निधी नाशिकची आहे आणि ती सोशल मीडिया सेन्सेशन आहे. तिचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. ग्लॅमरस फोटो आणि टॅलेंटमुळे तिचे हजारो फॉलोअर्स आहेत.

निधी तापडिया हिनं अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे. निधीनं तिच्या करिअरची सुरुवात २०१६ साली एक टेलिव्हिजन अभिनेत्री म्हणून केली होती. तिनं 'सीआयडी' या लोकप्रिय मालिकेतही काम केलं आहे. निधीला 'जट्टा कोका' गाण्यातून खरी ओळख मिळाली. हे गाणं पंजाबी गायक कुलविंदर बिल्ला यांनी गायलं होतं. नुकतंच ती टोनी कक्क़डच्या 'किस यू' गाण्यात दिसली होती.

रिपोर्ट्सनुसार निधीच्या आधी पृथ्वी शॉ अभिनेत्री प्राची सिंह हिला डेट करत होता. २०२० मध्ये दोघांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. पण आता दोघंही इन्स्टाग्रामवर एकमेकांना एनफॉलो केलं आहे.

पृथ्वी शॉला २०२१ साली शेवटची भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी पृथ्वीनं श्रीलंकेविरुद्धच ट्वेन्टी-२० सामना खेळला होता. आयपीएल २०२२ मध्ये पृथ्वीची कामगिरी ठिकठाक राहिली. त्यानं १० सामन्यांमध्ये २८३ धावा केल्या होत्या.

पृथ्वी शॉ आयपीएल २०२३ मध्येही दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत सध्या अपघातामुळे रुग्णालयात दाखल आहे. त्यामुळे तो आयपीएल खेळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे अशापरिस्थितीत पृथ्वी शॉकडे कर्णधारपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे.

पृथ्वी शॉ न्यू इयर पार्टीत निधीसोबत दिसल्यामुळे आता दोघांच्या अफेयरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (इन्स्टाग्राम)