IPL 2022, Purple Cap Winner to Net Bowler : नशिबाने पलटी मारली; MS Dhoniच्या मॅच विनर गोलंदाजाला Hardik Pandyaने नेट बॉलर म्हणून कामाला लावले!

IPL 2022, Purple Cap Winner to Net Bowler : भारतीय क्रिकेटचा नीट अभ्यास करणाऱ्यांना अनेक प्रेरणादायी कथा नक्की मिळतील. इंडियन प्रीमिअर लीगच्या आगमनानंतर छोट्याशा गावातल्या उदयोन्मुख खेळाडूंना मोठं व्यासपीठ दिलं आणि त्यापैकी अनेकांनी संधीचं सोनं केलं. पण...

IPL 2022, Purple Cap Winner to Net Bowler : भारतीय क्रिकेटचा नीट अभ्यास करणाऱ्यांना अनेक प्रेरणादायी कथा नक्की मिळतील. इंडियन प्रीमिअर लीगच्या आगमनानंतर छोट्याशा गावातल्या उदयोन्मुख खेळाडूंना मोठं व्यासपीठ दिलं आणि त्यापैकी अनेकांनी संधीचं सोनं केलं.

अनेकांचं नशीब उजळलं, पण फार कमी लोकांनाच हे नशीब टिकवता आला. रातोरात स्टार झालेले अनेक खेळाडू त्याच रात्रीच्या अंधारात कधी गायब झाले हे कळलेही नाही. २०१४च्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली खेळून पर्पल कॅप विजेता गोलंदाज २०२२च्या आयपीएलमध्ये नेट बॉलर म्हणून दिसत आहे. त्यामुळे नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला २६ मार्चपासून सुरूवात होत आहे. या पर्वात गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंट्स असे दोन संघ दाखल झाले आहेत. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाच्या नेट बॉलर्समध्ये मोहित शर्मा ( Mohit Sharma) याचे नाव पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.

मोहित शर्मा हा एककाळ MS Dhoniचा प्रमुख गोलंदाज होता. २०१४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तो भारतीय संघाचा सदस्य होता आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतही तो संघासोबत होता. आयपीएलमध्ये २०१४मध्ये त्याने पर्पल कॅप जिंकली होती.

पण, चेन्नई सुपर किंग्सवर २ वर्षांची बंदी घातली गेली आणि मोहित शर्माचे नशीब बदलले. त्याला पंजाब किंग्सने आपल्या ताफ्यात घेतले, परंतु त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.

महेंद्रसिंग धोनीनं त्याला पुन्हा ताफ्यात घेतले, परंतु त्याचा फॉर्म हरवला. त्यानंतर २०२०मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल झाला. त्याला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली.

मोहित शर्माने आयपीएलमध्ये ८६ सामन्यांत ९२ विकेट्स घेतल्या आहेत. भारताकडून तो २६ वन डे व ८ ट्वेंटी-२० सामन्यांत खेळला आहे आणि त्याने अनुक्रमे ३१ व ६ विकेट्स घेतल्या आहेत.