Join us  

IPL 2022, Purple Cap Winner to Net Bowler : नशिबाने पलटी मारली; MS Dhoniच्या मॅच विनर गोलंदाजाला Hardik Pandyaने नेट बॉलर म्हणून कामाला लावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 10:50 AM

Open in App
1 / 7

IPL 2022, Purple Cap Winner to Net Bowler : भारतीय क्रिकेटचा नीट अभ्यास करणाऱ्यांना अनेक प्रेरणादायी कथा नक्की मिळतील. इंडियन प्रीमिअर लीगच्या आगमनानंतर छोट्याशा गावातल्या उदयोन्मुख खेळाडूंना मोठं व्यासपीठ दिलं आणि त्यापैकी अनेकांनी संधीचं सोनं केलं.

2 / 7

अनेकांचं नशीब उजळलं, पण फार कमी लोकांनाच हे नशीब टिकवता आला. रातोरात स्टार झालेले अनेक खेळाडू त्याच रात्रीच्या अंधारात कधी गायब झाले हे कळलेही नाही. २०१४च्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली खेळून पर्पल कॅप विजेता गोलंदाज २०२२च्या आयपीएलमध्ये नेट बॉलर म्हणून दिसत आहे. त्यामुळे नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

3 / 7

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला २६ मार्चपासून सुरूवात होत आहे. या पर्वात गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंट्स असे दोन संघ दाखल झाले आहेत. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाच्या नेट बॉलर्समध्ये मोहित शर्मा ( Mohit Sharma) याचे नाव पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.

4 / 7

मोहित शर्मा हा एककाळ MS Dhoniचा प्रमुख गोलंदाज होता. २०१४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तो भारतीय संघाचा सदस्य होता आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतही तो संघासोबत होता. आयपीएलमध्ये २०१४मध्ये त्याने पर्पल कॅप जिंकली होती.

5 / 7

पण, चेन्नई सुपर किंग्सवर २ वर्षांची बंदी घातली गेली आणि मोहित शर्माचे नशीब बदलले. त्याला पंजाब किंग्सने आपल्या ताफ्यात घेतले, परंतु त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.

6 / 7

महेंद्रसिंग धोनीनं त्याला पुन्हा ताफ्यात घेतले, परंतु त्याचा फॉर्म हरवला. त्यानंतर २०२०मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल झाला. त्याला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली.

7 / 7

मोहित शर्माने आयपीएलमध्ये ८६ सामन्यांत ९२ विकेट्स घेतल्या आहेत. भारताकडून तो २६ वन डे व ८ ट्वेंटी-२० सामन्यांत खेळला आहे आणि त्याने अनुक्रमे ३१ व ६ विकेट्स घेतल्या आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्सहार्दिक पांड्या
Open in App