Cricket Buzz»फोटो गॅलरी »Qualifier 1, MI vs DC: इशान, सूर्यकुमारची फटकेबाजी अन् बुमराहचा भेदक मारा; MIच्या विजयाचे हायलाईट्सQualifier 1, MI vs DC: इशान, सूर्यकुमारची फटकेबाजी अन् बुमराहचा भेदक मारा; MIच्या विजयाचे हायलाईट्स By स्वदेश घाणेकर | Published: November 05, 2020 11:40 PMOpen in App1 / 12मुंबई इंडियन्सचा संघ इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ ठऱला. 2 / 12रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड शून्यावर बाद होऊनही मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)च्या अन्य फलंदाजांनी धमाकेदार खेळ करताना संघाला २०० धावांचा पल्ला गाठून दिला. या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals)चे फलंदाज दबावाखाली दिसले. 3 / 12जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांनी DCच्या फलंदाजांची तारांबळ उडवताना MIला अंतिम फेरीत प्रवेश करून दिला. मुंबई इंडियन्सनं सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी २०१० वगळता मुंबई इंडियन्सनं २०१३, २०१५, २०१७ व २०१९मध्ये जेतेपद पटकावले. 4 / 12क्विंटन डी'कॉकनं पहिल्याच षटकात १५ धावा चोपून मुंबईला दमदार सुरूवात करून दिली. पण, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरनं दुसऱ्याच षटकात आर अश्विनला गोलंदाजीला आणले. त्यानं पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला ( ०) पायचीत करून माघारी पाठवले. 5 / 12सूर्यकुमार यादव व क्विंटन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून MIची गाडी रुळावर आणली. क्विंटन डी'कॉक ४० धावांवर माघारी परतला. सूर्यकुमारनं ३८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ५१ धावा केल्या.किरॉन पोलार्डही ( ०) अश्विनचा सोपा शिकार ठरला. अश्विननं ४ षटकांत २९ धावांत तीन विकेट्स घेतल्या. 6 / 12मुंबईला धक्के बसूनही त्यांच्या धावांचा वेग काही कमी झाला नाही. इशान किशन व हार्दिक पांड्या यांनी षटकारांची आतषबाजी करताना मुंबईला मोठा पल्ला गाठून दिला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ताबडतोड २३ चेंडूंत 60* धावा चोपल्या. 7 / 12मुंबई इंडियन्सनं ५ बाद 200 धावा चोपल्या. हार्दिकनं १४ चेंडूंत ५ षटकारांसह नाबाद ३७ धावा केल्या, इशाननं ३० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या. 8 / 12मुंबईनं उभ्या केलेल्या तगड्या आव्हानाचा भार दिल्लीचे आघाडीचे फलंदाज पेलवू शकले नाही. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात पृथ्वी शॉ व अजिंक्य रहाणे बाद झाले. त्यानंतर जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या षटकात शिखऱ धवनला बाद केले. दिल्लीचे आघाडीचे तीनही फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. 9 / 12कर्णधार श्रेयस अय्यरला ( १२) बाद करून बुमराहनं दिल्लीची अवस्था ४ बाद २० धावा अशी दयनीय केली. त्यानंतर कृणाल पांड्यानं DCच्या रिषभ पंतला ( ३) बाद करून त्यांची अवस्था ५ बाद ४१ अशी केली. 10 / 12मार्कस स्टॉयनिस तंबू ठोकून बसला आणि त्यानं अर्धशतकी खेळी करताना अक्षर पटेलसह सहाव्या विकेटसाठी ५०+ धावा जोडल्या. स्टॉयनिस ६५ धावांवर माघारी परतला. अक्षर पटेलनं ४२ धावा केल्या. 11 / 12या दोघांव्यतिरिक्त दिल्लीच्या फलंदाजांनी निराश केलं. बुमराहनं ४ षटकांत १ निर्धाव षटकासह १४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. दिल्लीला २० षटकांत ८ बाद १४३ धावा करता आल्या. मुंबईनं ५७ धावांनी सामना जिंकला. 12 / 12 आणखी वाचा Subscribe to Notifications