Join us  

भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं, अनेक स्टार खेळाडू दिले अन् आता राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर विराजमान होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 9:54 AM

Open in App
1 / 10

इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व स्थगित झाल्यानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात रोज नव्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. आयपीएलचा दुसरा टप्पा न झाल्यात २५०० कोटींचे नुकसान सहन करावे लागेल, असा अंदाज बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली व्यक्त करत असताना दुसरीकडे भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्याची घोषणा त्यांच्याकडून होते.

2 / 10

कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता भारतात लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवले जाईल, याची शक्यता कमी आहे. त्यात आयपीएल स्थगित झाल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

3 / 10

बीसीसीआयनं इंग्लंड दौऱ्यासाठी २० सदस्यीय संघ जाहीर केला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल व इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका यासाठी बीसीसीआयनं हा संघ जाहीर केला आहे. पण, जुलै महिन्यात टीम इंडिया B टीम सह श्रीलंका दौऱ्यावर जाणार असल्याचे गांगुलीनं जाहीर केलं.

4 / 10

भारतीय संघ या दौऱ्यावर तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. या कालावधीत विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर संघाचे नेतृत्व कोण करेल, याची सर्वांना उत्सुकता आहे. संघातील अनुभवी शिखर धवन याचे नाव आघाडीवर असले तरी पृथ्वी शॉ याच्याकडेही नेतृत्व सोपवले जाऊ शकते.

5 / 10

विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि अन्य खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण आणि फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोर हेही इंग्लंड दौऱ्यावर असतील. अशात श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीमला मार्गदर्शन कोण करेल, हा पेच समोर उभा राहिला आहे.

6 / 10

Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानसार श्रीलंकेला जाणाऱ्या टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद भारताचा माजी फलंदाज व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष राहुल द्रविड याच्याकडे जाणार असल्याची चर्चा आहे. त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा स्टाफ मदत करेल, अशी चर्चा सुरू आहे.

7 / 10

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉच्या नेतृत्वात टीम इंडियानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. मोहम्मद सिराज, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, पृथ्वी शॉ, शुबमन गिल, आदी अनेक युवा खेळाडूंनी NCA त राहुलच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं आहे.

8 / 10

श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवन, पृथ्वी, शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, खलिल अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आदी खेळाडू उपलब्ध आहेत.

9 / 10

स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार पारस म्हाम्ब्रे या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असतील तर राहुल द्रविड संघाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्यासोबत जाईल.

10 / 10

टॅग्स :राहूल द्रविडबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध श्रीलंका