Ramandeep Singh नं पहिल्याच चेंडूवर मारला सिक्सर; टी-२० मध्ये दाबात एन्ट्री करणारे ८ फलंदाज

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या बॉलवर सिक्सर मारणारे फलंदाज

भारतीय टी-२० संघातून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण करणाऱ्या रणदीप सिंगनं आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारत खाते उघडले. अँडिले सिमेलन याच्या गोलंदाजीवर त्याने हा षटकार मारला. टी-२० क्रिकेटमध्ये अशी दाबात एन्ट्री करणारा तो आठवा खेळाडू आहे.

सूर्यकुमार यादवनं २०२१ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या अहमदाबादच्या मैदानात आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील पहिला चेंडू खेळताना षटकार मारला होता. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर सूर्यानं तेवर दाखवले होते.

दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील मंगालिसो मोसेहले हा देखील या यादीत आहे. २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात या क्रिकेटरनं षटकार मारून खाते उघडले होते.

वेस्ट इंडिजच्या टिनो बेस्ट याने १३ फेब्रुवारी २०१३ रोजी आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २८ जुलैला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याला पहिल्यांदा बॅटिंगची संधी मिळाली. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता.

केरॉन पोलार्डनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात पदार्पण केले. पण २००८ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध त्याच्यावर बॅटिंगचा नंबर आला. या सामन्यात त्याने षटकार मारून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये खाते उघडल्याचे पाहायला मिळाले होते.

झेवियर मार्शल या कॅरेबियन क्रिकेटरनंही २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता.

वेस्ट इंडिजचा जेरोम टेलर हा देखील टी-२० क्रिकेटमधील पहिल्या चेंडूवर षटकार मारणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली होती.

२००७ मध्ये जोहन्सबर्गच्या मैदानात पाकिस्तानच्या ताफ्यातील गोलंदाज सोहेल तन्वीर याने भारतीय संघाविरुद्धच्या टी-२० सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता.