Cricket Buzz»फोटो गॅलरी »रशीदच्या फिरकीची जादू; 4 बॉलमध्ये 4 विकेट्स...रशीदच्या फिरकीची जादू; 4 बॉलमध्ये 4 विकेट्स... By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 1:11 PMOpen in App1 / 7भारतीय संघाला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला, पण त्याचवेळी देहरादून येथे सुरू असलेल्या ट्वेंटी-20त अफगाणिस्तान संघानं तिसऱ्या सामन्यातही आयर्लंडला नमवून मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. अफगाणिस्ताननं तिसऱ्या सामन्यात आयर्लंडवर 32 धावांनी विजय मिळवला. 2 / 7अफगाणिस्ताननं मोहम्मद नबीच्या 81 धावांच्या ( 36 चेंडू, 6 चौकार व 7 षटकार ) जोरावर 7 बाद 210 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात आयर्लंडला 8 बाद 178 धावा करता आल्या. केव्हिन ओ,ब्रायन ( 74) आणि अँडी बॅल्बीर्नी ( 47) यांचा संघर्ष अपयशी ठरला.3 / 7या विजयासह अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा सलग ट्वेंटी-20 सामने जिंकण्याचा विक्रम मोडला. पाकिस्तानने 2018 मध्ये सलग 9 सामने जिंकले होते आणि अफगाणिस्तानने 2018-19 मध्ये सलग दहा सामने जिंकण्याचा विक्रम केला. त्यांनी 2016-17 मध्ये सलग 11 सामने जिंकले आहेत.4 / 7या सामन्यात रशीद खानच्या फिरकीच्या जादूनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. त्यानं 27 धावा देत आयर्लंडचा निम्मा संघ माघारी पाठवला. या कामगिरीसह त्यानं आतापर्यंत एकाही फिरकीपटूला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये न करता आलेला विक्रम स्वतःच्या नावावर केला.5 / 7रशीदने या सामन्यात हॅटट्रिक नोंदवली आणि चौथ्या चेंडूवरही विकेट घेतली. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये चार चेंडूंत चार विकेट्स घेणारा तो पहिला फिरकीपटू ठरला. यासह त्याने श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाच्या चार चेंडूत चार विकेट्स घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. 6 / 7ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये यापूर्वी ब्रेट ली, जेकब ओराम, टीम साऊदी, थिसारा परेरा, लसिथ मलिंगा आणि फहिम अश्रफ या जलदगती गोलंदाजांनाच हॅटट्रिक घेता आली आहे. फिरकीपटून रशीदने या पंक्तीत स्थान पटकावले.7 / 7ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक विकेट्सचा मानही रशीदनं पटकावला. त्यानं आयर्लंडविरुद्ध 10 सामन्यांत 28 विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा ( 21 विकेट्स वि. न्यूझीलंड) विक्रम मोडला. आणखी वाचा Subscribe to Notifications