Join us  

Ravi Shastri KL Rahul, IPL 2022 RCB vs LSG : "तर ही वेळ आलीच नसती"; रवी शास्त्री केएल राहुलवर प्रचंड संतापले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 4:14 PM

Open in App
1 / 6

Ravi Shastri KL Rahul, IPL 2022 RCB vs LSG : लखनौ संघाविरूद्धच्या सामन्यात RCB ने विजय मिळवला आणि संघाला क्वालिफायर-२ साठी पुढे नेलं. रजत पाटीदारच्या शतकाच्या जोरावर RCBने लखनौला २००हून अधिक धावा करून दिल्या.

2 / 6

२०८ धावांच्या अवघड लक्ष्याचा पाठलाग करताना सामना १५व्या षटकापर्यंत लखनौचा संघाच्या नियंत्रणात होता. पण नंतर आवश्यक धावगती गाठताना तारांबळ उडाल्याने लखनौचा १४ धावांनी पराभव झाला.

3 / 6

लखनौला शेवटच्या तीन-चार षटकात अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही. याच मुद्द्यावरून टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री लोकेश राहुलवर चांगलेच संतापले.

4 / 6

'काही वेळा विकेट वाचवण्याच्या नादात फलंदाज खूपच बचावात्मक खेळतात. ९ ते १४ षटकांच्या टप्प्यात लखनौच्या संघाकडून चांगली भागीदारी झाली, पण एका फलंदाजाने जबाबदारी घेऊन फटकेबाजी करणं आवश्यक होतं.'

5 / 6

'दीपक हुड्डा आणि लोकेश राहुल यांच्यात जेव्हा भागीदारी होत होती, त्यावेळी हुड्डा फटकेबाजी करण्याच्या प्रयत्न करत होता. पण लोकेश राहुलने थोडी जास्त जोखीम उचलायला हवी होती. ते सेट झाला होता त्यामुळे त्याने फटकेबाजीची जबाबदारी घ्यायला हवी होती.'

6 / 6

हर्षल पटेल शेवटच्या काही षटकांमध्ये गोलंदाजी करणार हे माहिती होतं. तो गतीमध्ये चांगलं मिश्रण करतो हेदेखील साऱ्यांना माहिती होतं. त्यामुळे आधीच्या षटकांमध्ये थोडी फटकेबाजी केली असती तर नंतर RCB वर दबाव टाकणं लखनौसाठी सोपं गेलं असतं आणि पराभवाची ही वेळ आली नसती', अशा शब्दांत रवी शास्त्री यांनी राहुलची फलंदाजीतील चूक अधोरेखित करत त्याच्यावर टीका केली.

टॅग्स :आयपीएल २०२२लोकेश राहुलरवी शास्त्रीलखनौ सुपर जायंट्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App