Join us  

उमेश यादवची विराटशी बरोबरी, ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची पराक्रमी कामगिरी; पहिल्या दिवसाचे जबरदस्त विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 5:25 PM

Open in App
1 / 7

ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी केली. भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळल्यानंतर उस्मान ख्वाजा ( ६०) आणि मार्नस लाबुशेन (३१) या जोडीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर ४ बाद १५६ धावा करताना ४७ धावांची आघाडी घेतली. जडेजाने ६३ धावांत ४ विकेट्स घेतल्या.

2 / 7

भारताची ही चौथी निचांक खेळी ठरली. २००८मध्ये दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात भारताला ७६ धावांवर गुंडाळले होते. त्यापूर्वी १९९९ मध्ये न्यूझीलंडने मोहाली कसोटीत ८३ धावांवर भारत ऑल आऊट झाला होता. १९८७मध्ये वेस्ट इंडिजने ७५ धावांत भारताचा पहिला डाव गुंडाळला होता.

3 / 7

पाच विकेट्स घेण्यासाठी सर्वात कमी षटकं टाकणाऱ्या ऑसी गोलंदाजांमध्ये कुहनेमनने पाचवे स्थान पटकावले. त्याने ९ षटकांत १६ धावांवर ५ विकेट्स घेतल्या. या विक्रमा मायकेल क्लार्क ( ६-९ ( ६.२ षटकं) वि. भारत, २००४) अव्वल क्रमांकावर आहे. त्यानंतर एच ट्रंम्बल ( ७-२८ (६.५ षटकं) वि. इंग्लंड󠁧 १९०४), टीम मे ( ५-९ ( ६.५ षटकं) वि. वेस्ट इंडिज १९९३) आणि एच आआयरोनमोंगर ( ५-६ ( ७.२ षटकं) वि. दक्षिण आफ्रिका १९३२ ) यांचा क्रमांक येतो.

4 / 7

आशिया खंडाबाहेरील गोलंदाजाने सर्वाधिक विकेट्स घेतल्याचा विक्रम आज नॅथन लियॉनने नावावर केला. त्याने आज तीन विकेट्स घेतल्या आणि लियॉनच्या नावावर आता १२९ विकेट्स झाल्या आहेत. यापूर्वी आशिया खंडात सर्वाधिक विकेट्सचा विक्रम दिवंगत शेन वॉर्नच्या ( १२७) नावावर होता. न्यूझीलंडच्या डॅनिएल व्हिटोरी (९८), द. आफ्रिकेचा डेल स्टेन ( ९२) आणि इंग्लंडचा जेम्स अँडरसन ( ८२) हे अव्वल पाच गोलंदाज आहेत.

5 / 7

नॅथन लियॉनने १२ वेळा चेतेश्वर पुजाराला कसोटी क्रिकेटमध्ये बाद केले आहे. एकाच गोलंदाजकडून सर्वाधिक बाद होणारा पुजारा दुसरा भारतीय ठरला. जेम्स अँडरसननेही १२ वेळा पुजाराची विकेट घेतलीय, तर डेरेक अंडरवूहड यांनी १२वेळा सुनील गावस्कर यांना बाद केले.

6 / 7

उमेश यादवने कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या २४ षटकारांची बरोबरी केली. रोहित शर्मा ६८ षटकारांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर रिषभ पंत ( ५५), रवींद्र जडेजा ( ५५), अजिंक्य रहाणे ( ३४), मयांक अग्रवाल ( २८), मोहम्मद शमी ( २५) यांचा क्रमांक येतो.

7 / 7

रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० विकेट्सचा टप्पा ओलांडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००+ विकेट्स व ५०००+ धावा करणारा रवींद्र जडेजा हा दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी कपिल देव यांनी हा पराक्रम केला आहे. जडेजाने ६३ कसोटी, १७१ वन डे आणि ६४ ट्वेंटी-२० सामन्यांत अनुक्रमे २६२३, २४४७ व ४५७ धावा केल्या आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजा
Open in App