टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. Wisden ने जाडेजाला 21 व्या शतकातला भारताचा Most valuable player म्हणून घोषित केलं आहे.
गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही प्रकारांत जाडेजा सर्वोत्तम कामगिरी करत असल्यामुळे त्याची या निवड झालेली आहे. तीनही क्षेत्रात कामगिरीचा अभ्यास केल्यानंतर विस्डनने त्याचं नाव घोषित केलं आहे. त्याला 97.3 गुण मिळाले.
2009 साली जाडेजाने भारतीय संघात पदार्पण केलं. त्याने आतापर्यंत 49 कसोटी, 165 वन-डे आणि 49 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
कसोटीत 1869, वन डेत 2296 आणि ट्वेंटी-20 त 173 धावा केल्या आहेत, तर अनुक्रमे 213, 187 आणि 39 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय संघाच्या या अष्टपैलू खेळाडूचा थाटही तितकाच राजेशाही आहे. गुजरात येथील जामनगर येथे त्याचा चार मजली बंगला आहे. त्याचा हा बंगला सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.