Join us  

IPL2023: RCB आणि २३ एप्रिल... खास कनेक्शन... घडल्यात ४ मोठ्या गोष्टी! जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 3:31 PM

Open in App
1 / 6

RCB and 23rd April Connection, IPL 2023: भारतात सध्या IPLची धामधूम सुरू आहे. सर्वच संघ विजयासाठी दमदार खेळ करत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर RCB संघ चांगल्या लयीत आहे. विराट कोहली नियमित कर्णधारपदी नसला तरी तो तुफान फॉर्मात आहे.

2 / 6

RCBच्या संघाने अद्याप एकही विजेतेपद मिळवलेले नाही. पण यंदाच्या हंगामात त्यांची दमदार कामगिरी सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी ६ पैकी ३ सामने जिंकले असून ६ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. आज, २३ एप्रिलला ते आपला सातवा सामना खेळणार आहेत. मात्र २३ एप्रिल आणि RCB यांचं एक खास नातं आहे. जाणून घेऊया या कनेक्शनबद्दल...

3 / 6

RCBच्या संघाने IPL 2012 मध्ये २३ एप्रिलला सामना खेळला होता. या सामन्यात बंगलोरच्या संघाने राजस्थानला ४६ धावांनी पराभूत केले होते. या सामना फारसा लक्षात ठेवण्याजोगा नसला तरी २३ एप्रिलचे यादीतील पुढचे तीनही सामने RCBचे खेळाडू आणि चाहते कधीच विसरू शकत नाहीत.

4 / 6

IPL 2013 मध्ये २३ एप्रिलच्या सामन्यात बंगलोरने पुणे वॉरियर्स संघाविरूद्ध IPL इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या उभारली होती. ख्रिस गेलच्या नाबाद १७५ धावांच्या साथीने RCBने ५ बाद २६३ धावा केल्या होत्या.

5 / 6

IPL 2017 मध्ये २३ एप्रिललाच बंगलोरच्या संघाने सर्वात वाईट कामगिरी केली. त्यांनी IPLमधील त्यांची सर्वात कमी धावसंख्या नोंदवली. बंगलोरचा संपूर्ण संघ ४९ धावांत माघारी परतला होता. हा सामना त्यांच्यासाठी वाईट आठवणीसारखाच ठरला.

6 / 6

IPL 2022 मध्ये २३ एप्रिल हा दिवस पुन्हा एकदा RCB साठी काळ बनून आला. IPL मध्ये बंगलोरचा संपूर्ण संघ शंभरी पार न करण्याचा हा दुसराच सामना ठरला. RCBला त्या सामन्यात केवळ ६८ धावाच करता आल्या होत्या. आता आजही २३ एप्रिल असून आज RCBचा संघ राजस्थान विरूद्ध कोणता नवा विक्रम रचतो ते पाहावे लागेल.

टॅग्स :आयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीख्रिस गेल
Open in App