RCB ready for IPL 2022 Mega Auction : जगातील टॉप ऑल-राऊंडरसाठी RCBनं ठेवलाय १२ कोटींचा बजेट; CSKच्या मॅचविनर फलंदाजासाठीही कसलीय कंबर!

RCB ready for IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे.

RCB ready for IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स हे तगडे संघ विस्कळीत झालेली घडी पुन्हा कशी बसवतात व कोणत्या खेळाडूंना ताफ्यात घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पण, विराट कोहलीच्या Royal Challengers Bangloreबाबत फार उत्सुकता आहे.

विराट कोहलीनं IPL 2021च्या सुरुवातीला RCB चे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्याच्या मार्गदर्शनाखालील त्या स्पर्धेतही RCB ला अपयश आले.

आता RCB नव्या कर्णधाराच्याच नव्हे, तर चांगल्या खेळाडूंच्याही शोधात आहे. त्यासाठी आता फ्रँचायझीने तीन खेळाडूंची नावं शॉर्ट लिस्ट केली आहेत आणि त्यात एक खेळाडू हा CSKचा मॅचविनर फलंदाज आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने IPL 2022 साठी संघात विराट कोहली ( १५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी), मोहम्मद सिराज ( ७ कोटी) या तीन खेळाडूंना कायम राखले आहे आणि आता मेगा ऑक्शनसाठी त्यांच्याकडे ५७ कोटी रक्कम शिल्लक आहे.

"बेन स्टोक्स यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नाही, हार्दिक पांड्या व मार्कस स्टॉयनिस यांना आधीच अनुक्रमे अहमदाबाद व लखनौ फ्रँचायाझींनी करारबद्ध केले आहे. मिचेल मार्श आयपीएलच्या किती सामन्यांसाठी उपलब्ध असेल याची माहिती नाही. त्यामुळे RCB ने तगडा अष्टपैलू संघात घेण्याचे ठरवले आहे,''असे सूत्रांनी सांगितले.

PTI ने दिलेल्या वृत्तानुसार RCBच्या सूत्रांनी IPL 2022 Mega Auction साठीचा मेगा प्लान सांगितला आहे. वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर ( Jason Holder ) याच्यासाठी RCB प्रयत्नशील असणार आहे. नुकत्याच इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत होल्डरने उल्लेखनीय कामगिरी केली. शिवाय भारताविरुद्धच्या पहिल्या वन डेतही त्याने अर्धशतक झळकावले.

''होल्डरसाठी आम्ही १२ कोटी राखून ठेवले आहेत. त्याशिवाय ८ कोटी अंबाती रायुडूसाठी व ७ कोटी रियान परागसाठी राखून ठेवले आहेत. या तिघांवर जवळपास २७ कोटी खर्च केल्यानंतर उर्वरित खेळाडूंसाठी त्यांच्याकडे २८ कोटी राहतील,''असे सूत्रानी PTI ला सांगितले.