Join us  

RCB ready for IPL 2022 Mega Auction : जगातील टॉप ऑल-राऊंडरसाठी RCBनं ठेवलाय १२ कोटींचा बजेट; CSKच्या मॅचविनर फलंदाजासाठीही कसलीय कंबर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 7:25 PM

Open in App
1 / 7

RCB ready for IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स हे तगडे संघ विस्कळीत झालेली घडी पुन्हा कशी बसवतात व कोणत्या खेळाडूंना ताफ्यात घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पण, विराट कोहलीच्या Royal Challengers Bangloreबाबत फार उत्सुकता आहे.

2 / 7

विराट कोहलीनं IPL 2021च्या सुरुवातीला RCB चे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्याच्या मार्गदर्शनाखालील त्या स्पर्धेतही RCB ला अपयश आले.

3 / 7

आता RCB नव्या कर्णधाराच्याच नव्हे, तर चांगल्या खेळाडूंच्याही शोधात आहे. त्यासाठी आता फ्रँचायझीने तीन खेळाडूंची नावं शॉर्ट लिस्ट केली आहेत आणि त्यात एक खेळाडू हा CSKचा मॅचविनर फलंदाज आहे.

4 / 7

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने IPL 2022 साठी संघात विराट कोहली ( १५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी), मोहम्मद सिराज ( ७ कोटी) या तीन खेळाडूंना कायम राखले आहे आणि आता मेगा ऑक्शनसाठी त्यांच्याकडे ५७ कोटी रक्कम शिल्लक आहे.

5 / 7

'बेन स्टोक्स यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नाही, हार्दिक पांड्या व मार्कस स्टॉयनिस यांना आधीच अनुक्रमे अहमदाबाद व लखनौ फ्रँचायाझींनी करारबद्ध केले आहे. मिचेल मार्श आयपीएलच्या किती सामन्यांसाठी उपलब्ध असेल याची माहिती नाही. त्यामुळे RCB ने तगडा अष्टपैलू संघात घेण्याचे ठरवले आहे,''असे सूत्रांनी सांगितले.

6 / 7

PTI ने दिलेल्या वृत्तानुसार RCBच्या सूत्रांनी IPL 2022 Mega Auction साठीचा मेगा प्लान सांगितला आहे. वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर ( Jason Holder ) याच्यासाठी RCB प्रयत्नशील असणार आहे. नुकत्याच इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत होल्डरने उल्लेखनीय कामगिरी केली. शिवाय भारताविरुद्धच्या पहिल्या वन डेतही त्याने अर्धशतक झळकावले.

7 / 7

''होल्डरसाठी आम्ही १२ कोटी राखून ठेवले आहेत. त्याशिवाय ८ कोटी अंबाती रायुडूसाठी व ७ कोटी रियान परागसाठी राखून ठेवले आहेत. या तिघांवर जवळपास २७ कोटी खर्च केल्यानंतर उर्वरित खेळाडूंसाठी त्यांच्याकडे २८ कोटी राहतील,''असे सूत्रानी PTI ला सांगितले.

टॅग्स :आयपीएल २०२२आयपीएल लिलावरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App