RCBच्या संघात झाली २४ वर्षीय सुंदरीची 'एन्ट्री! डेब्यू मॅचमध्ये घेतल्यात ५ विकेट्स, पाहा Photos

खुद्द रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने याबाबतची माहिती दिली

WPL 2025 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघात एका नवीन खेळाडूची एंट्री झाली आहे. या नवीन खेळाडूला एकूण ७८ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. ही खेळाडू म्हणजे चार्ली डीन.

२४ वर्षीय चार्ली डिनने RCB मध्ये सोफी मोलिनक्सची जागा घेतली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे सोफीला आगामी WPL मधून बाहेर पडावे लागले आहे. त्याजागी आलेली चार्ली फिरकी अष्टपैलू आहे.

चार्लीचे वडिलदेखील क्रिकेटर होते. तिच्या वडिलांनीच तिला क्रिकेटचा पहिला धडा शिकवला. तिचे वडील स्टीव्हन वॉरविकशायर आणि स्टॅफोर्डशायरसाठी क्रिकेट खेळले आहेत.

चार्ली डीनने २०१७ मध्ये तिच्या शाळेच्या संघासाठी पदार्पण केले आणि ५ विकेट्स घेतल्या. एका वर्षानंतर, तिने हॅम्पशायर अंडर-15 संघाचे नेतृत्व केले आणि रॉयल लंडन काउंटी कप उंचावला.

चार्ली डीन लहानपणापासून क्रिकेट खेळायची. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय तिच्या क्रिकेटला लवकर सुरुवात झाली. २०२१ मध्ये तिने इंग्लंडसाठी वनडे आणि २०२२ मध्ये कसोटी आणि T20 मध्ये पदार्पण केले.

आता ती इंग्लंड संघाची नियमित सदस्य असून प्रथमच WPL मध्ये खेळताना दिसणार आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील RCBच्या संघात ती आपल्या खेळाची आणि सौंदर्याची जादू दाखवणार आहे.

चार्लीला ३६ आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांचा अनुभव आहे. तिने ४६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच द हंड्रेड या महिला लीग स्पर्धेत ३० सामन्यांमध्ये तिने १८ विकेट्स आहेत.