Cricket Buzz»फोटो गॅलरी »सनरायझर्स हैदराबादनं 32 धावांत गमावले 8 फलंदाज; जाणून घ्या युजवेंद्र चहलनं कसा फिरवला सामनासनरायझर्स हैदराबादनं 32 धावांत गमावले 8 फलंदाज; जाणून घ्या युजवेंद्र चहलनं कसा फिरवला सामना By स्वदेश घाणेकर | Published: September 22, 2020 7:30 AMOpen in App1 / 16रॉयल चॅलेजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore) आणि सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातील एकतर्फी वाटत असलेला सामन्यात युजवेंद्र चहलनं ट्विस्ट आणला. 2 / 16जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) खेळपट्टीवर असेपर्यंत सामना SRHच्या मुठीत होता, पण युजवेंद्रच्या ( Yuzvendra Chahal) एका षटकानं सामन्याचे चित्रच बदलले.3 / 16RCBकडून आयच्या सामन्यात IPL मध्ये पदार्पण करणाऱ्या देवदत्त पडीक्कलनं ( Devdutt Padikkal) दमदार बॅटींग केली. आत्मविश्वासानं भरलेल्या देवदत्तनं आजच्या कामगिरीनं RCBची सलामीची चिंता मिटवली.4 / 16IPL 2020त पहिलाच सामना खेळणाऱ्या देवदत्तनं ( Padikkal) आरोन फिंच ( Aaron Finch) सारख्या अनुभवी फलंदाजासह RCBला दमदार सुरुवात करून दिली.5 / 16देवदत्तनं 42 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीनं 56 धावा केल्या. त्यानं प्रथम श्रेणी, लिस्ट ए, ट्वेंटी-20मध्ये पदार्पणाच्या सामन्यातील अर्धशतकाची परंपरा IPL मध्येही कायम राखली.6 / 16त्यानंतर एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) याने दमदार खेळ करताना 30 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 51 धावा केल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर RCBनं 5 बाद 163 धावा उभारता आल्या. 7 / 16लक्ष्याचा पाठलाग करताना SRHची सुरुवात निराशाजनक झाली. संघाचा कर्णधार व फॉर्मात असलेला फलंदाज डेव्हिड वॉर्नर दुर्दैवीरित्या धावबाद झाला. 8 / 16जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow ) आणि मनीष पांडे ( Manish Pandey) यांनी RCBच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. SRH हा सामना जिंकतील असे सहज वाटत होते. बेअरस्टो आणि पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावा जोडल्या. युजवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal) एका षटकानं सामना फिरवला.9 / 16चहलनं ही जोडी तोडताना पांडेला ( 34) धावांवर बाद केले. दोन वेळा जीवदान मिळालेल्या बेअरस्टो 16 व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बेअरस्टोने 43 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 61 धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर चहलनं SRHच्या विजय शंकरला त्रिफळाचीत केले. 10 / 16चहलला हॅटट्रिकची संधी होती, परंतु अभिषेक शर्मानं एक धाव घेत त्याला यश मिळवू दिले नाही. युझवेंद्रनं 4 षटकात 18 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर SRHचा संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला.11 / 16शिवम दुबे व नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर डेल स्टेननं एक विकेट घेत SRHचा डाव 19.4 षटकांत 153 धावांवर गुंडाळला.12 / 16एकेकाळी 2 बाद 121 अशा मजबूत स्थितित असलेला SRHचा डाव 153 धावांवर गडगडला. त्यांचे 8 फलंदाज अवघ्या 32 धावांत माघारी पाठवले. याआधी दिल्ली कॅपिटल्सनं 2019मध्ये सनरायझर्स हैदाराबाद विरुद्ध अखेरच्या पाच षटकांत 8 विकेट्स घेतल्या होत्या. 13 / 1614 / 1615 / 1616 / 16 आणखी वाचा Subscribe to Notifications