Record Breaker : यशस्वी जैस्वालने १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात कधी न घडलेला विक्रम नोंदवला

India vs England 3rd Test Live Updates Day 4 : यशस्वी जैस्वालने पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांना बेक्कार चोप दिला. राजकोट कसोटीत पुन्हा एकदा द्विशतक झळकावून भीमपराक्रम नोंदवला. २३वर्षीय यशस्वीने आज महान फलंदाज सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी यांचा विक्रम मोडला.

२३ वर्षीय यशस्वीने कसोटीत ३ वेळा १५० हून अधिक धावा केल्या आणि इतक्या कमी वयात हा पराक्रम करणारा तो भारताचा पहिला फलंदाज बनला. त्याने सचिन तेंडुलकर ( २) व विनोद कांबळी ( २) यांना मागे टाकले.

कसोटी कारकीर्दितील पहिल्या ३ शतकांचे १५०+धावांत रुपांतर करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी जावेद मियाँदाद, अँड्य्रू जोन्स, ब्रायन लारा, माहेला जयवर्धने, मॅथ्यू सिनक्लेअर, ग्रॅमी स्मिथ यांनी हा पराक्रम केला आहे.

यशस्वी २२ वर्ष व ५२ दिवसांचा आहे आणि वयाच्या २४ वर्षांखालील एकापेक्षा जास्त १५०+ वेळा धावा केल्या. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या ( २४ वर्ष व ३३६ दिवस) नावावर होता.

कसोटी क्रिकेटच्या एका इनिंग्जमध्ये १० षटकार खेचणारा यशस्वी दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी २०१६ मध्ये बेन स्टोक्सने वयाच्या २४ वर्षी व २१३ दिवसांचा असताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा पराक्रम केला होता. यसस्वी आज २२ वर्ष व ५२ दिवसांचा आहे.

कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात एका मालिकेत २० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार खेचणारा यशस्वी पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्मा ( १९ वि. दक्षिण आफ्रिका, २०१९) याच्या नावावर होता.

घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेत ५००+ धावा करणारा यशस्वी हा भारताचा सातवा सलामीवीर ठरला. या विक्रमात सुनील गावस्कर ( ७३२ वि. वेस्ट इंडिज, १९७८), वीरेंद्र सेहवाग ( ५४४ वि. पाकिस्तान, २००५), रोहित शर्मा ( ५२९ धावा वि. दक्षिण आफ्रिका, २०१९), एम मंकड ( ५२६ धावा वि. न्यूझीलंड, १९५५), बीके कंदेरन ( ५२५ वि. इंग्लंड १९६४) यांनी असा पराक्रम केला. यशस्वीने ५१७* धावा करून सुनील गावस्कर ( ५१४ धावा वि. पाकिस्तान, १९७९) यांचा विक्रम मोडला.

२२व्या वर्षी कसोटी मालिकेत भारताकडून ५००+ धावा करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. सुनील गावस्कर यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध असा पराक्रम केला होता.

यशस्वीने २३१ चेंडूंत द्विशतक झळकावले आणि कसोटीतील भारताकडून झालेल हे पाचवे जलद द्विशतक ठरले. यापूर्वीचे चार जलद द्विशतक हे वीरेंद्र सेहवागने ( १६३ चेंडू वि. श्रीलंका) नोंदवली आहेत.