Cricket Buzz»फोटो गॅलरी »भारतीय संघाची विक्रमी कामगिरीभारतीय संघाची विक्रमी कामगिरी By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 11:01 AMOpen in App1 / 8भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटीही तिसऱ्या दिवशी खिशात घातली. भारताने हा सामना 10 विकेट राखून जिंकताना मालिकेत 2-0 असे निर्विवाद वर्चस्व गाजवले. 2 / 8वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 311 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात भारताने 367 धावा उभ्या केल्या, परंतु विंडीजचा दुसरा डाव 127 धावांवर गडगडला आणि भारताने विजयासाठीचे 72 धावांचे लक्ष्य सहज पार केले. 3 / 8युवा सलामीवीर पृथ्वी शॉने (33*) विजयी धाव घेतली. भारताकडून विजयी धाव घेणारा पृथ्वी हा सर्वात युवा खेळाडू ठरला. 18 वर्षे 339 दिवसांच्या पृथ्वीने देवेंद्र बिशूच्या गोलंदाजीवर विजयी चौकार लगावला. 4 / 8भारताने कसोटी क्रिकेटमध्ये आठव्यांदा सलग दहा कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांनी पहिल्यांदाच विंडीजवर दहा विकेट राखून विजय मिळवला आहे. 5 / 8गोलंदाज उमेश यादवने विंडीजच्या संघाला दुसऱ्या डावात धक्के दिले. त्याने 88 धावा देताना सहा विकेट घेतल्या. 6 / 8या विजयासह घरच्या मैदानावर सलग दहा कसोटी जिंकण्याचा विक्रमही भारताने नावावर केला. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियानंतरचा दुसरा संघ ठरला आहे. 7 / 8आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उमेश यादवला प्रथमच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने या कसोटीत एकूण दहा विकेट घेतल्या.8 / 8पदार्पणात शतक आणि दुसऱ्या कसोटीत 70 व नाबाद 33 धावा करणाऱ्या पृथ्वी शॉला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. आणखी वाचा Subscribe to Notifications