Join us  

Records broken in ICC World Cup 2023: १५ विश्वविक्रमांची झाली नोंद, त्यापैकी ५ एकट्या रोहित शर्माने तोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 4:21 PM

Open in App
1 / 10

वर्ल्ड कप २०२३ च्या पहिल्या दोन टप्प्यांत आतापर्यंत एकूण १५ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले आणि त्यापैकी ५ हे एकट्या रोहित शर्माने नोंदवली, तर विराट कोहलीच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला.

2 / 10

वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात वेगवान शतकाचा विक्रम एडन मार्करमने नावावर केला. २०११मध्ये आयर्लंडच्या केव्हीन ओ'ब्रायनने इंग्लंडविरुद्ध नोंदवलेला विक्रम मार्करमने मोडला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मार्करमने ४९ चेंडूंत शतक झळकावले. रोहित शर्मा आणि कुसल मेंडिस यांनीही यंदाच्या पर्वात अनुक्रमे ६३ व ६५ चेंडूंत शतक झळकावले आहे. रोहित हा भारताकडून वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला. त्याने कपिल देव यांचा ( ७२ चेंडू वि. झिम्बाब्वे, १९८३) विक्रम मोडला.

3 / 10

वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या- दक्षिण आफ्रिकेने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध ५ बाद ४२८ धावांचा डोंगर उभा केला आणि ही वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

4 / 10

या सामन्यात रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन, क्विंटन डी कॉक आणि एडन मार्करम यांनी शतक झळकावले. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच एकाच इनिंग्जमध्ये तीन फलंदाजांनी शतक झळकावले. वन डे क्रिकेटमध्ये असे चौथ्यांदा घडले. या सामन्यात एकूण १०७ चौकार खेचले गेले आणि हाही वर्ल्ड कप स्पर्धेतील मोठा विक्रम आहे.

5 / 10

वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद ५० विकेट्स घेण्याचा विक्रम मिचेल स्टार्कने नावावर केला. २०१५ आणि २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्सचा विक्रम स्टार्कने नोंदवला होता. त्याने २०१५ मध्ये २२ आणि २०१९मध्ये २७ विकेट्स घेतल्या होत्या. यंदाच्या पर्वात भारताच्या इशान किशनची विकेट ही त्याची पन्नासावी विकेट ठरली. त्याने १९ इनिंग्जमध्ये हा पराक्रम करताना श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाचा ( २५) विक्र मोडला. ग्लेन मॅकग्राथ व मुथय्या मुलरीधरन यांनी प्रत्येकी ३० इनिंग्जमध्ये हा पल्ला गाठला होता.

6 / 10

पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम केला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने ३४५ धावा केल्या. पाकिस्तानची अवस्था २ बाद ३७ अशी झाली होती, परंतु शफिक ( ११३) आणि रिझवान ( १३१*) यांच्या खेळीने चित्र बदलले.

7 / 10

रोहित शर्माने वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ७ शतकं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५५६ षटकारांचा विक्रम नावावर केला. अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीत झालेल्या सामन्यात रोहितने ८४ चेंडूंत १३१ धावा केल्या. भारताने २७२ धावांचे लक्ष्य ८ विकेट्स व ९० चेंडू राखून सहज पार केले. रोहितने त्याच्या खेळीत १६ चौकार व ५ षटकार खेचले. त्याने सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक ६ शतकांचा विक्रम मोडला.

8 / 10

रोहित शर्माने अवघ्या १९ इनिंग्जमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत ७ शतकं झळकावली, तर सचिन तेंडुलकरने ४४ इनिंग्जमघ्ये ६ शतकं झळकावली होती. पण, वर्ल्ड कप स्पर्धेत सचिनने सर्वाधिक २२७८ धावा केल्या आहेत आणि त्याही ५६.९५च्या सरासरीने. रोहितने सरासरीच्या बाबतीत सर्वांना मागे टाकले आहे त्याने ६५.२३च्या सरासरीने वर्ल्ड कपमध्ये धावा केल्या आहेत.

9 / 10

अफगाणिस्तानविरुद्ध ५ षटकार खेचून रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५५६ षटकारांचा विक्रम नावावर केला. त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला. गेलपेक्षा ( ४७२) ८० इनिंग्ज कमी खेळून रोहितने हा पराक्रम केला.

10 / 10

ऑस्ट्रेलियाला १९९६ नंतर प्रथमच वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हार पत्करावी लागली. शिवाय १९९२ नंतर ते प्रथमच वर्ल्ड कपमध्ये पहिले दोन सामने हरले आहेत.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपरोहित शर्माद. आफ्रिकापाकिस्तानआॅस्ट्रेलिया