Richest Wives of Indian Cricketers: सचिन तेंडुलकर ते चेतेश्वर पुजारा... 'या' क्रिकेटर्सच्या पत्नी लग्नाआधीपासूनच होत्या गडगंज श्रीमंत

भारतीय क्रिकेटर्स श्रीमंत असतात यात वादच नाही. पण काही क्रिकेटपटूंच्या पत्नीदेखील लग्नाआधीपासूनच गजगंज श्रीमंत आहेत. पाहूया असे क्रिकेटर्स आणि त्यांच्या पत्नींनी यादी...

भारतीय क्रिकेटर्स श्रीमंत असतात यात वादच नाही. पण काही क्रिकेटपटूंच्या पत्नीदेखील लग्नाआधीपासूनच गजगंज श्रीमंत आहेत. पाहूया असे क्रिकेटर्स आणि त्यांच्या पत्नींनी यादी...

सचिन आणि अंजली तेंडुलकर - सचिनने १९९५ साली डॉ. अंजली मेहता हिच्याशी लग्न केलं. अंजली श्रीमंत परिवारातच लहानाची मोठी झाली. तिचे पणजोबा एक श्रीमंत जमीनदार होते. अंजलीचे वडिल आनंद मेहता हेदेखील बडे उद्योगपती आहेत.

हरभजन सिंग आणि गीता बसरा - हरभजनची पत्नी गीता बसरा ही एक अभिनेत्री तर आहेच पण त्यासोबतच ती लंडनचे बडे उद्योगपती राकेश बसरा यांची मुलगी आहे. यावरूनच तुम्ही अंदाज बांधू शकता की गीता लग्नाआधीपासूनच खूप श्रीमंत होती. या दोघांनी २०१५मध्ये लग्न केलं.

रवींद्र जाडेजा आणि रिबावा सोळंकी - या दोघांनी २०१६ साली विवाह केला. रिवाबा गुजरात काँग्रेसचे बडे नेता हरिसिंग यांची पुतणी आहे. ती स्वत:सुद्धा भाजपशी संबंधित आहे. रिवाबाचे पिता हरकेश सोळंकी यांचा परिवार त्यांच्या विभागातील श्रीमंत परिवारांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

रोहित शर्मा आणि रितीका सजदेह - रोहितने रितिकाशी २०१५ साली लग्न केलं. रितिका एका श्रीमंत घरची मुलगी आहे. लग्नाआधी ती मुंबईतील कफ परेडसारख्या पॉश ठिकाणी वास्तव्यास होती. रितिकाचा भाऊ बंटी हा सेलिब्रिटी मॅनेजर आहे. रितिका स्वत:देखील सेलिब्रिटी मॅनेजर आहे.

गौतम गंभीर आणि नताशा जैन - गंभीरने नताशा जैनशी २०११ साली लग्न केलं. नताशाचे पिता रवींद्र जैन हे एक मोठे उद्योगपती आहेत. त्यांचा टेक्सटाईलचा मोठा व्यवसाय आहे. गौतम गंभीरचे वडिल देखील उद्योजक असल्याने या दोघांचा विवाह झाला.

विरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत - विरेंद्र सेहवागची पत्नी आरती ही दिल्लीचे लोकप्रिय वकील सूरज सिंह अहलावत यांची मुलगी आहे. २००४ साली या विरेंद्र सेहवागचं आरतीशी लग्न झालं. सध्या आरती सेहवागच्या सर्व शाळा आणि क्रिकेट अॅकडमीचा कार्यभार सांभाळते.

चेतेश्वर पुजारा आणि पुजा पाबरी - भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने २०१३ साली पुजा पाबरीशी लग्न केलं. पूजाचं घराणं खूप श्रीमंत आहे. तिचे वडील टेक्टटाईल क्षेत्रातील मोठे उद्योजक आहेत.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा - विराट अनुष्काने २०१७ साली लग्न केलं. अनुष्का लग्नाआधीपासूनच लोकप्रिय होती. ब़ॉलिवूडमधील अभिनेत्री म्हणून तिचा नावलौकिक होता. ती स्वत: श्रीमंत आहेत पण तिचे वडील देखील वायुसेनेत बडे अधिकारी होते. तर तिचा भाऊ कर्णेश शर्मा मर्चंट नेव्ही ऑफिसर आहे.