Join us

Rinku Singh: मालदीवमध्ये IPL चा शिनवटा काढतोय रिंकू, हॉट फोटोवर शहलीनची कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 16:26 IST

Open in App
1 / 10

कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाच्या आयपीएलमधील निराशाजनक मोहिमेत शानदार कामगिरी करूनही युवा फलंदाज रिंकू सिंगचे पाय जमिनीवर आहेत.

2 / 10

सध्या भारतीय संघात निवडीबाबत विचार करत नाही, असे त्याने म्हटले आहे. नुकतेच पार पडलेल्या IPL सत्रात गुजरात टायटंसविरुद्ध कोलकाताच्या विजयात पाच षटकार लगावून रिंकू प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

3 / 10

संघाचा मौल्यवान फलंदाज आणि फिनिशर म्हणून त्याची ओळख झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यास रिंकू प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे.

4 / 10

२५ वर्षीय रिंकूने यंदाच्या आयपीएलच्या सत्रात चार अर्धशतक लगावले आहेत. अखेरच्या सामन्यात ३३ चेंडूंत नाबाद ६७ धावा करत रिंकूने विजयाची संधी निर्माण केली होती. मात्र, कोलकाताचा संघ अवघ्या एका धावेने पराभूत झाला.

5 / 10

यंदाच्या आयपीएल हंगामात रिंकूने कोलकातासाठी ५९.२५ च्या सरासरीने आणि १४९ पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने ४७४ धावा केल्या आहेत. आयपीएल हंगाम संपल्यानंतर आता तो सुट्ट्या एन्जॉय करतोय.

6 / 10

रिंकू सध्या मालदीवमध्ये असून तेथील स्वीमिंग पुलमध्ये त्याने फोटोशूट केलंय. रिंकूने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. तर KKR च्या ट्विटर अकाऊंटवरुनही हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

7 / 10

रिंकुने फोटोतून आपले सिक्स एब्स दाखवले आहेत. साध्याभोळ्या रिंकूचा हा स्टायलिश अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. शुभबन गिलची बहिण शहलीन गिलनेही रिंकूच्या फोटोवर कमेंट केलीय.

8 / 10

रिंकूने शनिवारी विमानतळावरील फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये तो वेटिंगरुममध्ये आराम करताना दिसून येतोय.

9 / 10

रिंकुला टीम इंडियाच्या टी-२० संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, बेस्ट फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. केकेआर संघातून त्याने बेस्ट फिनिशर म्हणून तडफदार कामगिरी केलीय.

10 / 10

आयपीएलमधील यंदाच्या हंगामात रिंकुने धडाकेबाज कामगिरी करत नाव कमावलं, त्यामुळे त्याचा मोठा चाहतावर्गही बनलाय. ज्यांना रिंकुकडून मोठ्या अपेक्षा आहेत

टॅग्स :रिंकू सिंगआयपीएल २०२३मालदीवकोलकाता नाईट रायडर्स
Open in App