Join us  

ऑडीपासून मर्सिडीजपर्यंत... रिषभ पंतकडे 6 कोटींहून अधिक किंमतीची वाहने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 4:22 PM

Open in App
1 / 7

बहुतेक खेळाडूंना लक्झरी गाड्यांचे शौकीन आहेत. रिषभ पंतला अनेक गाड्यांची आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक आलिशान गाड्या आहेत. शुक्रवारी रिषभ पंतचा (Rishabh Pant) सकाळी अपघात झाला. त्यावेळी तो त्याची लक्झरी कार मर्सिडीज बेंझ जीएलईही (Mercedes-Benz GLE) चालवत होता.

2 / 7

2016 च्या आयपीएल लिलावात रिषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सने 1.9 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यावेळी तो अवघ्या 19 ​​वर्षांचा होता. एवढ्या मोठ्या रकमेचे काय करणार असा प्रश्न त्याला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला, तेव्हा त्याने आलिशान कार खरेदी करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.

3 / 7

दरम्यान, रिषभ पंत यांची पहिली पसंती लक्झरी वाहनाला नव्हती. पंतला नेहमी i20 कार खरेदी करायची होती. ही कार इतकी का आवडते, हे माहित नाही, असे तो म्हणाला होता. त्‍यानंतर आपल्याजवळ 100 कोटी रुपये असले तरी तीच कार खरेदी करणार, असे त्‍याने म्हटले होते.

4 / 7

i20 चे स्वप्न पाहणारा पंत आज करोडोंच्या गाड्यांचा मालक आहे. 2017 मध्येच त्यांनी पहिली कार खरेदी केली. त्यांची पहिली कार मर्सिडीज-बेंझ सी-क्लास (Mercedes-Benz C-class) होती. या कारची किंमत 1.9 कोटी रुपये होती. यानंतर क्रिकेट जगतात त्याची कामगिरी चांगली झाली आणि लक्झरी गाड्यांची संख्याही वाढत गेली.

5 / 7

रिषभ पंतकडे सध्या 60 लाख रुपयांची मर्सिडीज-बेंझ सी-क्लास (Mercedes-Benz C-class), 74 लाख रुपयांची फोर्ड मुश्टांग (Ford Mushtang) आणि 1 कोटी रुपयांची मर्सिडीज-बेंझ जीएलई ( Mercedes-Benz GLE) आहे. काही रिपोर्ट्सनुसार, पंतकडे 1.9 कोटी किमतीची ऑडी A8 (Audi A8) देखील आहे. पंत याच्याकडील गाड्यांची एकूण किंमत सहा कोटींहून अधिक आहे.

6 / 7

भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत याचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. हरिद्वारमध्ये दिल्ली-डेहरादून हायवेवर पंतची मर्सिडीज कार भरधाव वेगाने डिव्हायडरवर धडकली. या अपघातात पंतला गंभीर इजा झाली आहे, पण तो सध्या धोक्याबाहेर आहे. उत्तराखंड सरकारने उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे.

7 / 7

उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, रिषभ पंतच्या शरीराला जास्त जखमा नाहीत, परंतू त्याचा एक पाय फ्रॅक्टर असण्याची शक्यता आहे. त्याला डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते, आता त्याला दिल्लीला हलविण्यात येणर आहे

टॅग्स :रिषभ पंतकारवाहनअपघात
Open in App