Join us

Rishabh Pant Accident: आलिशान कारचा कोळसा, शरीरावर गंभीर जखमा, समोर आले रिषभ पंतच्या अपघातानंतरचे भयावह फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 10:13 IST

Open in App
1 / 5

भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज रिषभ पंत याच्या कारला आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला आहे. रिषभ पंतची आलिशान कार नारसन बॉर्डरजवळ डिव्हायडरवर आदळली. या आपघातामध्ये पंतच्या आलिशान कारचा जळून कोळसा झाला आहे.

2 / 5

अपघातानंतर रिषभ पंतला रुडकी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही जखमा झाल्या आहेत, त्यावर उपचार सुरू आहेत.

3 / 5

या भीषण अपघातात पंत बालंबाल बचावला असून, त्याच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टर त्याची प्लॅस्टिक सर्जरी करण्याचा विचार करत आहेत.

4 / 5

रिषभ पंतला झालेल्या अपघाताचे अनेक फोटो समोर आले आहे. पंतला रुग्णालयात दाखल करतानाचे फोटो दिसून येत आहेत. तसेच पंतच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा दिसत आहेत. तध्या त्याची तपासणी सुरू आहे.

5 / 5

टॅग्स :रिषभ पंतअपघात
Open in App